नागपुरात १,२८० अतिदक्षता खाटांचे रुग्णालय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 10:35 PM2020-05-14T22:35:24+5:302020-05-14T22:38:16+5:30

कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या सध्या उपचारासाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या विद्यमान व्यवस्थेत बदल करून केवळ एका महिन्यात सुसज्ज ‘कोविड-१९’ हॉस्पिटल तयार करून १,२८० रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Nagpur has 1,280 cots intensive care units hospital | नागपुरात १,२८० अतिदक्षता खाटांचे रुग्णालय सज्ज

नागपुरात १,२८० अतिदक्षता खाटांचे रुग्णालय सज्ज

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार : कोरोनाबाधित रुग्णांसाठी एका महिन्यात तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या सध्या उपचारासाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या विद्यमान व्यवस्थेत बदल करून केवळ एका महिन्यात सुसज्ज ‘कोविड-१९’ हॉस्पिटल तयार करून १,२८० रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विशिष्ट कोविड रुग्णालय, कोविड आरोग्य केंद्र व कोविड दक्षता केंद्रे उभी केली आहेत. याशिवाय कोविड-१९ संशयितांकरिता विलगीकरण केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, सचिव अजित सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरात १,२८० रुग्णांकरिता दोन स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील ट्रॉमा केअर सेंटर या नवीन इमारतीमध्ये एकूण २६२ खाटांची सोय करण्यात आली आहे. २६२ खाटापैकी १२९ खाटांचे मेडिकल गॅस पाईपलाईन व इतर आनुषंगिक उपकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १५० तासांच्या आत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील २०१६ मध्ये बांधून झालेली पाच मजली सर्जिकल कॉम्प्लेक्स इमारत होती. या इमारतीत अस्तित्वातील १३ वॉर्डांचे आधुनिकीकरण व नवीन ९ वॉर्डांसह एकूण २२ वॉर्ड कोविड-१९ च्या ५६८ गंभीर रुग्णांसाठी केवळ २० दिवसांत सुसज्ज केले आहेत.
कोविड हॉस्पिटलची निर्मिती करताना आवश्यक पार्टिशन्ससह प्रामुख्याने मेडिकल गॅस पाईपलाईन, आॅक्सिजन सप्लाय उपकरणे व आॅक्सिजन बँक प्रस्थापित करण्याकरिता शेडची उभारणी करणे व सर्व अत्याधुनिक उपकरणे स्थापित करणे, प्रसाधनगृहे तयार करण्यात आली आहेत. ५६८ कोविड-१९ रुग्णांना अतिदक्षतेची सेवा उपलब्ध असणारे दक्षिण-मध्य आशियातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय सज्ज झाले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर परिसरात पंतप्रधान आरोग्य योजना अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत १२० गंभीर रुग्णांकरिता अतिदक्षता विभाग आॅक्सिजन बँक व इतर उपकरणे स्थापित करण्याकरितादेखील शेडसह सोय व परिसरातील इतर १० वॉर्डांना जोडण्याकरिता अतिदक्षता विभागापासून स्वतंत्र पाथ-वे तयार करण्यात आला. ही सर्व कामे १५ दिवसात पूर्ण करण्यात आली आहेत. याच परिसरातील उपलब्ध असलेल्या एकूण वॉर्डांपैकी ८ वॉर्डांचे नूतनीकरण करण्यात आले असून ३३० कोविड रुग्णांसाठी हे वॉर्ड पूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार आहेत.
कोविड हॉस्पिटल तयार करताना वॉर्डमध्ये सारी आजाराचे रुग्ण तर काही ठिकाणी कोविड-१९ चे रुग्णदेखील अ‍ॅडमिट असल्यामुळे कंत्राटदाराचे मजूर पळून जात होते. पेशंट असलेल्या वॉर्डमध्ये सदर मजूर काम करीत असल्याने आवश्यक दक्षता घेताना रुग्णांनाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

Web Title: Nagpur has 1,280 cots intensive care units hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.