नागपुरात बोगस मतदान झालेच : एकाच्या नावावर दुसऱ्यानेच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:55 AM2019-04-12T00:55:27+5:302019-04-12T00:57:13+5:30

प्रशासनाने पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला असतानाही बोगस मतदान झाल्याचे प्रकार समोर आले. मतदार जेव्हा मतदानासाठी केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच्या जागी आधीच दुसऱ्या बोगस मतदाराने मतदान केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची आपली तक्रारही निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली नाही, अशी तक्रार या मतदारांनी केली आहे.

Nagpur has been declared a bogus: one has done the same in the name of another | नागपुरात बोगस मतदान झालेच : एकाच्या नावावर दुसऱ्यानेच केले

नागपुरात बोगस मतदान झालेच : एकाच्या नावावर दुसऱ्यानेच केले

Next
ठळक मुद्देयंत्रणेने न्याय न दिल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाने पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला असतानाही बोगस मतदान झाल्याचे प्रकार समोर आले. मतदार जेव्हा मतदानासाठी केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच्या जागी आधीच दुसऱ्या बोगस मतदाराने मतदान केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची आपली तक्रारही निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली नाही, अशी तक्रार या मतदारांनी केली आहे.
बबलू सोमकुंवर हे नारा येथे राहतात. व्होटर लिस्टमध्ये त्यांचे नाव आहे. पण ते नारा येथील मतदान केंद्रात मतदानासाठी गेले असता, त्यांना सांगण्यात आले की त्यांचे मतदान झाले आहे. बूथ क्रमांक ५५ व अनुक्रमांक ५२३ मध्ये ललित सुनील मेश्राम यांच्यासोबतसुद्धा असाच प्रकार घडला. ते जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेत मतदान करण्यास गेले होते. पण त्यांचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. निर्मला कॉन्व्हेंटमध्ये मतदान करण्यास गेलेले सोनू डोईफोडे यांनासुद्धा मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी मतदान अधिकाऱ्यांना तक्रारही केली. आता काहीच करता येणार नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. काँग्रेसचे नेता मिलिंद सोनटक्के यांनी आरोप केला की, मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. प्रशासनाने प्रकरणाची गंभीर चौकशी करणे गरजेचे आहे. ओळखपत्र आवश्यक असतानाही कुणीही कुणाच्याही नावावर मतदान कसे करू शकते, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
विदर्भ बुनियादीतही दुसऱ्याच्या नावावर मतदान
अमोल सुरेश काकडे रा. ओमनगर, सक्करदरा आणि शारदा राजेश गेडाम रा. जुनी शुक्रवारी या दोन्ही मतदाराचे मतदान विदर्भ बुनियादी हायस्कूल, मीरची बाजार येथे होते. परंतु यांच्या नावावर दुसऱ्यांनीच कोणी मतदान केले होते. याची तक्रार किंग कोबरा ऑर्गेनायझेन युथ फोर्सचे संस्थापक अरविंदकुमार रतुडी यांच्याकडे त्यांनी केली. रतुडी यांनी मतदान केंद्र अधिकारी व पोलिसांना याची माहिती दिली. परंतु समाधान होऊ शकले नाही. याबाबत आता ते रितसर पोलिसांकडे तक्रार करणार आहेत, असे रतुडी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
.प्रतापनगरात बोगस मतदान
दक्षिण पश्चिम नागपुरात दोन मतदान केद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार प्राप्त झाली. प्रतापनगरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स मधील बूथ क्रमांक ५२ येथे स्वप्निल तितरे यांच्या नावावर अगोदरच मतदान झाले होते. तर आयटी पार्क येथील प्रादेशिक कामगार संस्थेतील मतदान केंद्रातील बूथ क्रमांक ११३ वर सचिन कटारे यांच्या नावावर बोगस मतदान झाले. मतदान केंद्रावर गेल्यानंतर ही बाब समोर आली. जोगीनगर येथील मतदान क्रमांक २३९ वर पार्वती बोंदरे ही महिला मतदान करण्यासाठी आली. मात्र त्यांच्या नावावर अगोदरच कुणीतरी मत दिले होते. बोंदरे या हस्ताक्षर करु शकतात, मात्र त्यांच्या नावासमोर कुणीतरी अंगठा लावून चालले गेले.

Web Title: Nagpur has been declared a bogus: one has done the same in the name of another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.