देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:04 PM2020-05-22T20:04:21+5:302020-05-22T20:06:12+5:30

कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी ७४ टक्के रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

Nagpur has the highest cure rate of corona in the country | देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी ७४ टक्के रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.
रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण भारतात ४०.४ टक्के तर राज्यात २६.३ टक्के एवढे असून त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात तसेच देशातही सर्वाधिक आहे. कोरोनाबाधितांच्या तपासणीसह उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार करण्यात आला. त्यासोबतच उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू चोवीस तास उपलब्ध आहे.
कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शहरात पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा असून यामध्ये शहरातील ९ हजार ८१८ स्वॅबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये जगात सर्वाधिक जर्मनी येथील रुग्ण बरे होण्याचे ८७.९ टक्के, इटली ५३.३, फ्रान्स ३४.९, अमेरिका २३.३, रशिया २७.७ इतके आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर महाराष्ट्रात २६.३ टक्के एवढी आहे. त्या तुलनेत नागपूर शहरात पूर्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

Web Title: Nagpur has the highest cure rate of corona in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.