राज्यात ‘अॅट्रॉसिटी’चे नागपुरात सर्वाधिक गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 02:51 AM2020-10-05T02:51:42+5:302020-10-05T02:52:14+5:30
चिंताजनक प्रमाण; देशात नवव्या स्थानी, महिलांवर अत्याचार
- योगेश पांडे
नागपूर : मागील तीन वर्षांत उपराजधानीमध्ये ‘अॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये दुप्पट गुन्हे दाखल झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे यातदेखील महिला अत्याचाराचेच सर्वात जास्त गुन्हे आहेत.
‘एनसीआरबी’च्या २०१९ सालच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिक्षेचे प्रमाण शून्य
पोलिसांकडून २०१९ मध्ये एकूण ८८ गुन्ह्यांची चौकशी झाली. यात २०१८ च्या प्रलंबित असलेल्या ३३ प्रकरणांचा समावेश होता. न्यायालयात ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत ३६ खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालीन दाखल अशा १६४ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही तर ३३ प्रकरणांत ७७ जणांची निर्दोष मुक्तता झाली.
राज्यात वृद्धही असुरक्षित
158 वृद्धांंची हत्या
10दरोडे घालण्याच्या
घटना समोर आल्या.
2051गुन्हे हे वृद्धांंना
लक्ष्य करून चोरी केल्याप्रकरणी दाखल झाले.
325जबरी चोरीच्या
गुन्ह्यांची नोंद झाली.
43विनयभंग व ज्येष्ठ महिलांवर बलात्काराचे २ गुन्हे घडले.
२०१९ साली नागपुरात ‘अॅट्रॉसिटी’चे एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१७ मध्ये हीच संख्या २८ तर २०१८ मध्ये २४ इतकी होती. तीन वर्षांत दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोठ्या शहरांत नागपूरचा राज्यात पहिला तर देशात नववा क्रमांक आहे.