- तर नागपुरात हाहाकार
By admin | Published: May 27, 2016 02:34 AM2016-05-27T02:34:59+5:302016-05-27T02:34:59+5:30
मान्सूनच्या तयारीच्या नावावर मनपा प्रशासन दरवर्षी प्रमाणे यंदाही नदी-नाल्यांच्या सफाईच्या कामाला लागले आहे.
नागपूर : मान्सूनच्या तयारीच्या नावावर मनपा प्रशासन दरवर्षी प्रमाणे यंदाही नदी-नाल्यांच्या सफाईच्या कामाला लागले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस जारी केल्या जात आहे. तरीही पुराच्या मूळ कारणांकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. फुटपाथ व रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्या बुजविल्या जात आहेत. या नाल्या पावसाने पाणी बाहेर काढण्यासाठी खास तयार करण्यात आल्या आहेत. त्या बुजवून पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली गेलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका कायम आहे.
कमी उंचीचे पूल धोकादायक
शहरातून वाहणाऱ्या नदीनाल्यांवर तयार करण्यात आलेले शेकडो पूल खूप जुने झाले आहेत. त्यांची उंची सुद्धा खूप कमी आहे. पूर्व-दक्षिण व उत्तर नागपुरात नदीनाल्यांमध्ये वाहून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासाठी जीर्ण झालेले आणि कमी उंचीचे पूल जबाबदार आहेत. काही वर्षांपूर्वी काही लोकं पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेले होते. पूर्व नागपुरात पुनापूर, पारडी, भरतवाडा रोड, पावनगाव, कळमना आदी भागांमध्ये नदींवर कमी उंचीचे व रुंदीचे पूल आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.