नागपूर: मदतीला धावला आणि दीड लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:03 AM2018-04-26T10:03:23+5:302018-04-26T10:03:31+5:30
रस्त्यावर पडलेल्या जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला जाणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या साथीदारांनी कार चालकाची नजर चुकवून कारमधील सव्वा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर पडलेल्या जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला जाणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या साथीदारांनी कार चालकाची नजर चुकवून कारमधील सव्वा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. ही घटना मंगळवारला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत ओमनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी बलविंदरसिंग डेहनसिंग मान (४८) रा. गुरुतेजबहादूरनगर, नारी रोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलविंदरसिंग घटनेच्या दिवशी त्यांच्या एमएच-४९/बी-२२८६ क्रमांकाच्या टाटा विस्टा कारने जात होते. कोराडी हद्दीत ओमनगर परिसरातून जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना ओव्हरटेक केले.
कारच्या समोर गेल्यावर अचानक तो दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन दुचाकीसह खाली पडला. त्याला गंभीर मार लागला असावा असे समजून बलविंदरसिंग कार थांबवून त्याच्या मदतीसाठी धावले होते.