Nagpur: सराईत वाहनचोराला पोलिसांनी केले गजाआड, २.८० लाखांच्या ९ दुचाकी केल्या जप्त

By दयानंद पाईकराव | Published: May 29, 2024 08:46 PM2024-05-29T20:46:12+5:302024-05-29T20:46:29+5:30

Nagpur Crime News: वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गजाआड करून इमामवाडा पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.

Nagpur: Imamwada police nabs Sarait vehicle theft, seizes 9 bikes worth 2.80 lakhs | Nagpur: सराईत वाहनचोराला पोलिसांनी केले गजाआड, २.८० लाखांच्या ९ दुचाकी केल्या जप्त

Nagpur: सराईत वाहनचोराला पोलिसांनी केले गजाआड, २.८० लाखांच्या ९ दुचाकी केल्या जप्त

- दयानंद पाईकराव
नागपूर - वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गजाआड करून इमामवाडा पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.

मोहित विनोद मेश्राम (२५, रा. बडवाईक बिल्डींग मागे, रामबाग, इमामवाडा) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नाव आहे. ४ मे रोजी सकाळी ११ वाजता दिनेश महादेव तिजारे (३६, रा. इंदिरानगर इमामवाडा) यांनी आपली २० हजार रुपये किमतीची दुचाकी लॉक करून ठेवली असता अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरी केली. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून इमामवाडा पोलिसांनी आरोपी मोहितला ताब्यात घेतले असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.

त्याची अधिक चौकशी केली असता त्याने इमामवाडा ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक, अजनी ठाण्याच्या हद्दीतून १, कोतवाली ठाण्याच्या हद्दीतून १, हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीतून १, गणेशपेठ ठाण्याच्या हद्दीतून १, सक्करदरा ठाण्याच्या हद्दीतून १, पाचपावली ठाण्याच्या हद्दीतून १ अशा एकुण ९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या २ लाख ८० हजाराच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई इमामवाडाचे ठाणेदार कमलाकर गड्डीमे, गणेश पवार, रविंद्र राऊत, संदिप बोरसरे, गणेश घुघुलकर, भगवती ठाकुर, विरेंद्र गुडरांधे, अमित पात्रे, सुशील रेवतकर, रणजीत सक्करवार यांनी केली.

Web Title: Nagpur: Imamwada police nabs Sarait vehicle theft, seizes 9 bikes worth 2.80 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.