नागपुरात २४ तासात रात्रीच्या तापमानात ५.८ अंशाने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 01:24 AM2019-05-05T01:24:32+5:302019-05-05T01:25:25+5:30
देशात आलेल्या फनी चक्रीवादळाने नागपुरातील वाढत्या तापमानावर ‘ब्रेक’ लावण्याचे काम केले आहे. परिणामी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परंतु रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात अचानक ५.८ अंशाची वाढ होऊन ते ३०.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. रात्रीचे सर्वाधिक तापमान नागपुरातच नोंदवण्यात आले आहे. ते सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअस अधिक असल्याने रात्रीचा उकाडा वाढला आहे. विदर्भात नागपूर हे एकमेव शहर आहे, जेथे रात्रीचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात आलेल्या फनी चक्रीवादळाने नागपुरातील वाढत्या तापमानावर ‘ब्रेक’ लावण्याचे काम केले आहे. परिणामी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परंतु रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात अचानक ५.८ अंशाची वाढ होऊन ते ३०.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. रात्रीचे सर्वाधिक तापमान नागपुरातच नोंदवण्यात आले आहे. ते सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअस अधिक असल्याने रात्रीचा उकाडा वाढला आहे. विदर्भात नागपूर हे एकमेव शहर आहे, जेथे रात्रीचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
हवामान विभागानुसार चक्रीवादळामुळे शेजारी राज्य असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील अनेक भागंमध्ये वादळ आणि पाऊस झाल्याचे वृत्त आहे. वादळामुळे विदर्भातही आकाशात ढग दाटून आले आहेत. परंतु कुठेही वादळ किंवा पावसाचे वृत्त नाही. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आकाशात दाटून आलेले ढगही निघून जातील आणि त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात होईल. ६ मे नंतर पुन्हा तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे.
मिंळालेल्या माहितीनुसार ४५.५ अंश सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वात उष्ण राहिले. त्यानंतर चंद्रपूरमध्ये ४५, वर्धामध्ये ४४.१, गडचिरोलीमध्ये ४३.२, अमरावतीमध्ये ४२.८, अकोलामध्ये ४२, यवतमाळमध्ये ४१.५, गोंदियामध्ये ४१, वाशिममध्ये ४०.२, बुलडाणामध्ये ३८.७ डिग्री सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले.