नागपुरात  मेट्रो खांबाचे लोखंड कारवर पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:09 AM2018-04-01T00:09:43+5:302018-04-01T00:09:52+5:30

शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहेत. दरम्यान लहान मोठे अपघात घडत असतात. काही अपघातात लोकांना जीवही गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. असाच एक अपघात शनिवारी पहाटे ५ वाजता सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकात घडला.

In Nagpur, the iron pole of the metro fell on the car | नागपुरात  मेट्रो खांबाचे लोखंड कारवर पडले

नागपुरात  मेट्रो खांबाचे लोखंड कारवर पडले

Next
ठळक मुद्देक्षतिग्रस्त वाहन दुरुस्त करून देणार प्रकल्प व्यवस्थापकाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहेत. दरम्यान लहान मोठे अपघात घडत असतात. काही अपघातात लोकांना जीवही गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. असाच एक अपघात शनिवारी पहाटे ५ वाजता सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकात घडला.
मेट्रो रेल्वेच्या पीलरसाठी लोखंड बांधण्याचे काम सुरू होते. दरम्यान लोखंडाचा एक मोठा तुकडा रस्त्याच्या काठावर उभ्या असलेल्या जैन प्लास्टीकचे संचालकांच्या जयेश जैन यांच्या कारवर पडला. पहाटेची वेळ असल्याने कारमध्ये कुणीही बसले नव्हते. म्हणून मोठा अनर्थ टळला. कारच्या छतावर लोखंड पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लोखंड पडल्याचा आवाज होताच नागरिक गोळा झाले. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवरील लोखंडाचा तुकडा बाजूला केला. यासंबंधात मेट्रोचे डीजीएम (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे यांनी या अपघाताची चौकशी केली जात असल्याचे सांगितले. बांधकामादरम्यान कोणती निष्काळजी झाली याची माहिती घेऊन दोषीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी मेट्रोच्या अधिकाºयांनी कारच्या मालकांशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच कार दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे आश्वासनही दिले.
टँकरही उलटला
टेलिफोन एक्सचेंज चौकात शनिवारी दुपारी रोड डिव्हाडरजवळून टर्न घेत असताना पाण्याचा टँकर उलटला. यावेळी टँकरच्या आजूबाजूला दुसरे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: In Nagpur, the iron pole of the metro fell on the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.