ठाकूरला रात्रभरात पावसाचा तडाखा; नागपूर झाले पाणीपुर

By योगेश पांडे | Published: September 23, 2023 08:55 AM2023-09-23T08:55:21+5:302023-09-23T08:55:58+5:30

पंचशील चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर इस्पितळे असून काही इस्पितळांच्या आत देखील पाणी शिरले आहे.

Nagpur is flooded in places today due to the rain that occurred after night in Nagpur on Friday. | ठाकूरला रात्रभरात पावसाचा तडाखा; नागपूर झाले पाणीपुर

ठाकूरला रात्रभरात पावसाचा तडाखा; नागपूर झाले पाणीपुर

googlenewsNext

नागपूर शुक्रवारी मध्ये रात्री नंतर झालेल्या पावसामुळे नागपूर आज जागोजागी पाणी भरले आहे. विजेच्या कडकडाटा सहज झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते देखील पाण्याखाली गेले असून अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

नागपूरचा मध्यवर्ती भाग असलेले सीताबर्डी पंचशील चौक धंतोली या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी रस्त्यांवर आले असून लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी भरले असून काही ठिकाणी भिंत खसल्याची माहिती देखील समोर आली आहे अनेक शाळांमध्ये देखील पाणी भरले असून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पंचशील चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर इस्पितळे असून काही इस्पितळांच्या आत देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे रुग्णांना देखील अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे.

Web Title: Nagpur is flooded in places today due to the rain that occurred after night in Nagpur on Friday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.