भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी नागपूरवर

By नरेश डोंगरे | Published: December 23, 2023 09:38 PM2023-12-23T21:38:28+5:302023-12-23T21:43:12+5:30

मेक इन इंडिया : डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिनची नागपूरच्या डेपोत देखभाल

Nagpur is responsible for the maintenance of India's most powerful railway engine | भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी नागपूरवर

भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी नागपूरवर

नागपूर : भारतातील सर्वात शक्तीशाली रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी नागपूरचारेल्वे डेपो पार पाडत असून पुढच्या काही दिवसांत या डेपोवर २५० इंजिनच्या देखभालीचा भार राहणार आहे. भारतीय रेल्वेने एलस्टम कंपनीच्या सहकार्याने डब्लूएजी १२ बी इलेक्ट्रिक इंजिन विकसित केले असून सध्या त्याचा वापर केला जात आहे. सध्य स्थितीत हे भारतातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन असून 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो.

रेल्वेच्या सूत्रांनुसार, मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड (एमईएलपीएल) नावाने एल्सटम या विदेशी कंपनीच्या सहकार्याने एकूण ८०० रेल्वे इंजिनच्या निर्मितीचे लक्ष्य बिहारच्या मधेपुरा कारखान्यात पूर्ण केले जाणार आहे. हे इंजिन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूकीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यासाठी इंजिन डिझाइन केले आहे. 

या इंजिनची देखभाल करण्यासाठी मध्य भारतातील नागपूरला तीन वर्षांपूर्वी डेपो तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी १७.६ एकर जमीनीत १०,८०० चौरस मीटर डेपो, १,७७७ चौरस मीटरचे गोदाम, ३.२९ किलोमीटरचा ट्रॅक आणि ३.५ किलोमीटर २५ केवी वीज पुरवठा अशा सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर औद्योगिक श्रेणींमध्ये उच्च-तंत्र औद्योगिक उपकरणांनी सुसज्ज असे १२ ट्रॅक समाविष्ट करण्यात आले.

सध्या १२६ इंजिनची देखभाल
या इंजिनच्या देखभालीसाठी सहारनपूर आणि नागपूरला डेपो निर्मिती करण्यात आली असून रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सहारनपूर आणि नागपूर अशा दोन्ही डेपोवर २५० रेल्वे इंजिनच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागपूर डेपोत सध्या १२६ इंजिनच्या देखभालीचे कामकाज केले जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 

Web Title: Nagpur is responsible for the maintenance of India's most powerful railway engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.