नागपुरात कुठे तुरळक तर कुठे बऱ्यापैकी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 12:00 AM2021-06-18T00:00:49+5:302021-06-18T00:01:16+5:30
Rain in Nagpur हवामान विभागाने जोराच्या पावसाचा इशारा दिला असला तरी गुरुवारी मात्र नागपुरात काही भागात तुरळक तर काही भागात बऱ्यापैकी पाऊस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाने जोराच्या पावसाचा इशारा दिला असला तरी गुरुवारी मात्र नागपुरात काही भागात तुरळक तर काही भागात बऱ्यापैकी पाऊस आला. यामुळे सायंकाळी वातावरणात १०० टक्के आर्द्रता नोंदविली गेली.
सकाळी शहरात मोकळे वातावरण होते. दुपारनंतर ढग जमा होऊन सुमारे १० ते १५ मिनिटे पाऊस आला. यामुळे दुपारी असलेल्या तापमानात घट नोंदविली गेली. कालच्यापेक्षा गुरुवारी ०.६ अंश सेल्सिअसने वाढ दर्शवून पारा ३५.६ अंश सेल्सिअसवर होता. सकाळी आर्द्रता ८२ टक्के असली तरी ती सायंकाळी वाढली.
शहरात मागील २४ तासात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली. या सोबतच अकोलामध्ये ३९ मिमी, बुलडाणा १५, अमरावती १ तर गोंदियात ७ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३५.१ : २१.६
अमरावती : ३२.३ : २२.५
बुलडाणा : २९.० : २२.०
चंद्रपूर : ३४.० : २०.८
गडचिरोली : ३३.० : २५.४
गोंदिया : ३५.० : २४.६
नागपूर : ३५.६ : २३.४
वर्धा : ३२.९ : २४.४
वाशिम : ३१.२ : २१.०
यवतमाळ : ३३.० : अप्राप्त