नागपूरचे सहपोलीस आयुक्त कदम निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:58 PM2020-05-30T23:58:45+5:302020-05-31T00:02:09+5:30

शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून सेवारत असलेले रवींद्र कदम यांना आज निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

Nagpur Joint Commissioner of Police Kadam retires | नागपूरचे सहपोलीस आयुक्त कदम निवृत्त

नागपूरचे सहपोलीस आयुक्त कदम निवृत्त

Next
ठळक मुद्देएक दिवसापूर्वीच निरोपएकाच दिवशी १५ जणांची निवृत्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून सेवारत असलेले रवींद्र कदम यांना आज निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. कदम यांनी त्यांच्या सेवाकाळातील अनेक वर्षे नागपुरात विविध पदांवर सेवा दिली आहे. येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान उपमहानिरीक्षक आदी पदांवर काम करणाऱ्या कदम यांनी दोन वर्षांपूर्वी नागपुरात सहपोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. ३१ मे ही त्यांच्या निवृत्तीची तारीख होती. परंतु उद्या रविवार असल्यामुळे पोलीस दलातर्फे त्यांना आज ३० मे रोजी निरोप देण्यात आला. पोलीस आयुक्तालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कदम यांना भेटवस्तू देऊन निरोप दिला.

१४ जणांची निवृत्ती
सहपोलीस आयुक्त कदम यांच्यासोबतच आज शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त राजरत्न बनसोड, पोलीस निरीक्षक किशोर पांडुरंग चौधरी, उपनिरीक्षक दिलीप दिलीप मारुती वानखेडे, फौजदार पुंडलिक दत्तूजी राऊत, दीपक नारायण कांबळे, सुलतानसिंग भिकाजी आडे, धरमसिंग पंजाबराव मसराम, श्रावण गुलाबराव वंजारी, तेजराम सुदामजी बरबटे, जकारिस फ्रान्सिस पाटील, हवलदार अंतराम कचरूजी लहुत्रे, हवालदार कुसुम वासुदेव चांदेकर, सिंधू प्रभुदास डोंगरे, हवालदार तोलाराम गणपतराव काळे आणि सिद्धार्थ नामदेव तायडे आदी १४ जणांना निवृत्तीनिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा पोलीस आयुक्तालयात सत्कार करण्यात आला. यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनिता शाहू, निर्मलादेवी, गजानन शिवलिंग राजमाने, राहुल माकणीकर, विवेक मासाळ, नीलोत्पल, विक्रम साळी आणि शहर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Nagpur Joint Commissioner of Police Kadam retires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.