नागपुरात गुन्हेगारीमधील वादात चाकू चालला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 07:42 PM2020-06-16T19:42:49+5:302020-06-16T19:44:21+5:30

चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली.

In Nagpur, a knife was used in a crime dispute | नागपुरात गुन्हेगारीमधील वादात चाकू चालला

नागपुरात गुन्हेगारीमधील वादात चाकू चालला

Next
ठळक मुद्देएक गंभीर जखमी : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली.
रोहित ऊर्फ कैची नरेंद्र मोहोड (वय २१) असे जखमीचे नाव आहे. तो इंदोऱ्यातील मायानगर गल्ली नंबर २ मध्ये राहतो. आरोपी कुणाल खोब्रागडे, मल्ल्या मेश्राम आणि त्याचा एक साथीदार सोमवारी पहाटे जरीपटक्यातील मायानगरात चोरी, घरफोडीच्या इराद्याने फिरत होते. मोहोडसोबत त्यांचा सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास चिमणकर यांच्या घरासमोर वाद झाला. तीनही आरोपी नशेत टुन्न होते. त्यामुळे त्यांनी मोहोडवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी पळून गेले. जखमी मोहोडला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी कुणाल खोब्रागडे, मल्ल्या मेश्राम या दोघांना अटक केली. त्यांचा साथीदार फरार असल्याचे पोलीस सांगतात. आरोपी कुणाल आणि मल्ल्या हे दोघेही कुख्यात गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

अमली पदार्थांचे व्यसन
चोरीच्या पैशातून ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतात. त्यांनी रविवारी मध्यरात्री नशेच्या गोळ्या खाल्ल्या आणि गुन्हा करण्यास निघाले. मध्येच मोहोडसोबत त्यांचा वाद झाला. त्यामुळे त्यांनी त्यालाच भोसकून गंभीर जखमी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

Web Title: In Nagpur, a knife was used in a crime dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.