नोव्हेंबरपासून चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:48 AM2018-09-06T11:48:17+5:302018-09-06T11:49:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ नोव्हेंबरपासून इंडिगो एअरलाईन्सची चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा दररोज सुरू राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ नोव्हेंबरपासून इंडिगो एअरलाईन्सची चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा दररोज सुरू राहील.
६ ई-३१४ हे विमान नागपुरातून १६.५५ वाजता रवाना होऊन १८.४० वाजता चेन्नईला पोहचेल. हेच विमान चेन्नईहून कोचीला २०.२५ वाजता पोहचेल. चेन्नईमार्गे कोची-नागपूर हे ६ ई ३०५ क्रमांकाचे विमान १२.१५ वाजता कोची येथून रवाना होऊन १४.१० वाजता चेन्नईला पोहोचणार आहे. हे विमान चेन्नईहून १५.५५ वाजता नागपुरात पोहचेल.
इंडिगोच्या नवीन उड्डाणासंदर्भात लोकमतने ३ आॅगस्टच्या अंकात बातमी प्रकाशित केली होती, हे उल्लेखनीय. त्यात नागपूर-चेन्नई विमानसेवेचा उल्लेख केला होता. या उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्स एअरबस-३२० या विमानाची सेवा देणार आहे. या विमानात प्रवासी क्षमता १८० सीटची आहे. हिवाळी शेड्यूलमध्ये एअरलाईन्स कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी भर देऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.