Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले

By दयानंद पाईकराव | Published: March 23, 2024 11:57 PM2024-03-23T23:57:47+5:302024-03-23T23:58:19+5:30

Nagpur News: तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली.

Nagpur: Link sent, 4.52 lakhs of retired professor blown | Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले

Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले

- दयानंद पाईकराव
नागपूर - तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ६३ वर्षीय सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक आपल्या घरी असताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर फोन करून वीज वितरण कंपनीतून बोलत असून तुमचे वीज बील पेंडींग असल्याची बतावणी केली. त्यानंतर आरोपीने त्यांना मोबाईलवर लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी माहिती भरली असता सायबर गुन्हेगाराने त्यांचा मोबाईल हॅक करून वेगवेगळ््या दिवशी वेगवेगळ््या बँकेतून ४ लाख ५२ हजार ५०९ रुपयांची जमापूंजी उडविली. संबंधीत सेवानिवृत्त प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Nagpur: Link sent, 4.52 lakhs of retired professor blown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.