Nagpur Lockdown: कोणत्या भागात कडक संचारबंदी?, काय बंद - काय सुरू?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:27 PM2021-03-11T13:27:36+5:302021-03-11T13:27:55+5:30

Nagpur Lockdown Rules and Restrictions: नागपुरात १५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या काळात काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या...

nagpur Lockdown all you need to know about restrictions and rules to be follow in lockdown period | Nagpur Lockdown: कोणत्या भागात कडक संचारबंदी?, काय बंद - काय सुरू?... जाणून घ्या

Nagpur Lockdown: कोणत्या भागात कडक संचारबंदी?, काय बंद - काय सुरू?... जाणून घ्या

Next

Nagpur Lockdown: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या जास्त आहे. नागरिकांनी प्रतिबंधांना गंभीर्याने घेतले नाही. नागरिकांना वारंवार सांगूनही भीती राहिली नसल्याने प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागले आहेत. (Lockdown in nagpur maharashtra 15 march to 21 march 2021 here are all rules to be follow) 

लॉकडाऊन काळात नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार? नेमकं कोणकोणत्या भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची माहिती जाणून घेऊयात...

नागपुरात काय सुरू, काय बंद?
>>नागपूर शहरात कडक संचारबंदी राहील
>> उद्योग सुरू राहतील
>> शासकीय कार्यालये २५ टक्के सुरू राहतील 
>> नागपुरातील लसीकरण मोहीम सुरू राहील
>>  भाजीपाला बाजार सुरू राहील
>> डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरू राहतील
>> अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
>> लक्ष्मीनगर, हनुमान नगर हॉट स्पॉट असल्यानं कडक संचारबंदी
>> आमदार निवासामध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येणार
>> विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार
>> प्रसार माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार

Read in English

Web Title: nagpur Lockdown all you need to know about restrictions and rules to be follow in lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.