नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आज होणार नागपूर-रामटेकचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:00 AM2019-05-23T06:00:00+5:302019-05-23T06:00:08+5:30

लोकसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी जाहीर होणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.

Nagpur Lok Sabha election result 2019; Nagpur-Ramtek's decision will be held today | नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आज होणार नागपूर-रामटेकचा फैसला

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आज होणार नागपूर-रामटेकचा फैसला

Next
ठळक मुद्देकोण होणार सिकंदर; गडकरी की पटोले, तुमाने की गजभिये ?सर्वच पक्ष आशावादी कार्यकर्त्यांप्रमाणेच जनतेमध्येदेखील उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी जाहीर होणार असून नागपूररामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील सव्वा महिन्यापासून निकालांबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. आता कुणाचे दावे खरे ठरले व कुणाचे आकडे हवेत विरले यावरून पडदा हटणार आहे. साधारणत: दुपारनंतर कल लक्षात येणार असला तरी निकालाचे अंतिम आकडे हाती यायला वेळ लागणार आहे.
विशेषत: नागपूर मतदारसंघाकडे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर दुसरीकडे काँग्रेसचे नाना पटोले अशी येथे लढत आहे. तर दुसरीकडे रामटेकमधून विद्यमान खासदार सेनेचे कृपाल तुमाने व काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात थेट सामना आहे. वृत्तवाहिन्यांवरील ‘एक्झिट पोल्स’नंतर नागपूर-रामटेकचा गड युती राखणार की आघाडी अनपेक्षित धक्का देणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
कळमना मार्केट यार्डमध्ये गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल व साधारणत: दुपारपर्यंत कलाचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब अजमावत असून त्यात नितीन गडकरी, नाना पटोले यांच्यासह बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, ‘बीआरएसपी’चे अ‍ॅड.सुरेश माने हेदेखील रिंगणात आहेत. निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपूरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. ११ एप्रिल रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ६५ मतदानकेंद्रांवर ५४.७४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. आता मतदारांनी आपली पसंती कुणाला दिली आहे व विजयाची माळ कुणाच्या गळ््यात पडणार यावरून गुरुवारी पडदा उठणार आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नागपूर लोकसभा
एकूण उमेदवार ३०
एकूण मतदार २१,६०,२३२
झालेले मतदान ११,८२,५०७
टक्केवारी ५४.७४ %

प्रमुख उमेदवार
नितीन गडकरी (भाजप)
नाना पटोले (काँग्रेस)
मोहम्मद जमाल (बसपा)
सागर डबरासे (वंचित बहुजन आघाडी)

 

Web Title: Nagpur Lok Sabha election result 2019; Nagpur-Ramtek's decision will be held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.