Nagpur Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत गडकरी दहा हजारांनी आघाडीवर

By योगेश पांडे | Published: June 4, 2024 09:15 AM2024-06-04T09:15:53+5:302024-06-04T09:19:15+5:30

Nagpur Lok Sabha Results 2024 : नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर

Nagpur Lok Sabha Results 2024 : Gadkari leads by ten thousand in the first round | Nagpur Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत गडकरी दहा हजारांनी आघाडीवर

Gadkari leads by ten thousand in the first round

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
Nagpur Lok Sabha Results 2024 : 
नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. कळमना मार्केट यार्ड परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएमच्या मोजणीला सुरुवात झाली. नागपूर पुर्वमध्ये गडकरी यांना ४ हजार ३०० हून अधिक मतांनी आघाडी मिळाली. तर दक्षिण पश्चिम नागपुरात २ हजार ३०० मतांनी गडकरी समोर होते. पश्चिम नागपुरात गडकरी यांना जवळपास दोन हजारांची आघाडी होती.

Web Title: Nagpur Lok Sabha Results 2024 : Gadkari leads by ten thousand in the first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.