आंतरप्रेस टी-२० क्रिकेट सामन्यात नागपूर लोकमत अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:00 AM2018-01-18T11:00:07+5:302018-01-18T11:03:12+5:30

नितीन पटारियाच्या अष्टपैलू कामगिरीच्या (सहा बळी, ३० धावा) बळावर लोकमतने उपांत्य सामन्यात लोकशाही वार्ता संघाचा सात गड्यांनी सहज पराभव करीत २० व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतर प्रेस टी-२० आमंत्रित क्रिकेट स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली.

Nagpur Lokmat in the final of the Inter-press T 20 cricket | आंतरप्रेस टी-२० क्रिकेट सामन्यात नागपूर लोकमत अंतिम फेरीत

आंतरप्रेस टी-२० क्रिकेट सामन्यात नागपूर लोकमत अंतिम फेरीत

Next
ठळक मुद्दे२० वे एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतरप्रेस टी-२० क्रिकेट सामनेनितीन पटारियाची चमकदार खेळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नितीन पटारियाच्या अष्टपैलू कामगिरीच्या (सहा बळी, ३० धावा) बळावर लोकमतने उपांत्य सामन्यात लोकशाही वार्ता संघाचा सात गड्यांनी सहज पराभव करीत २० व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतर प्रेस टी-२० आमंत्रित क्रिकेट स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हितवादने टीओआयचा ३३ धावांनी पराभव केला. गतविजेत्या लोकमतची अंतिम लढत हितवादविरुद्ध शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावर होईल.
स्पोर्टस जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर(एसजेएएन) तर्फे आयोजित या स्पर्धेचे पुरस्कर्ते आॅरेंजसिटी वॉटर हे असून स्टेट बँक आॅफ इंडिया सहपुरस्कर्ते आहेत. डीएनसीच्या वसंतनगर मैदानावर उपांत्य लढतीत लोकशाही वार्ता संघाला १९.५ षटकात १०७ धावांत बाद केल्यानंतर लोकमतने विजयी लक्ष्य ११.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. प्रवीण लोखंडेने सर्वाधिक ५१, नितीन पटारियाने ३० व शरद मिश्राने नाबाद १४ धावा केल्या. त्याआधी पटारियाने स्वत: तीन झेल घेत सहा गडी १६ धावांत बाद केले. तोच सामन्याचा मानकरी ठरला.आंबेडकर कॉलेज मैदानावर दुसऱ्या उपांत्य लढतीत हितवादने २० षटकांत ७ बाद १६७ धावा उभारल्या. त्यात पंकज बोरकरने २० चेंडूत ३० व अनुपम तिमोथीने ३३ चेंडूंत २८ धावा केल्या. प्रत्युत्तरात टाइम्स संघ ८ बाद १३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. विनय पांडेने ३० चेंडूत सर्वाधिक ५१ धावा काढल्या पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. २१ धावांत तीन बळी घेणारा रवी डफ सामनावीर ठरला. विदर्भाचे माजी कर्णधार प्रवीण हिंगणीकर, रेशीमबाग क्रिकेट अकादमीचे संचालक राजू कावरे, बालपांडे कॉलेज आॅफ फार्मसीचे संचालक मनोज बालपांडे आणि छत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ क्रीडा संघटक गिरिश गदगे यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.

Web Title: Nagpur Lokmat in the final of the Inter-press T 20 cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.