नागपूर हत्याकांड; क्रूरकर्मा आलोक जगत होता दुहेरी व्यक्तिमत्त्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 07:00 AM2021-06-24T07:00:00+5:302021-06-24T07:00:06+5:30

Nagpur News पत्नी, मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत: आत्महत्या करणारा क्ररकर्मा आलोक दुहेरी व्यक्तिमत्त्व जगत होता.

Nagpur massacre; Murderer Alok was a live double personality | नागपूर हत्याकांड; क्रूरकर्मा आलोक जगत होता दुहेरी व्यक्तिमत्त्व 

नागपूर हत्याकांड; क्रूरकर्मा आलोक जगत होता दुहेरी व्यक्तिमत्त्व 

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मीबाईच्या शिवीगाळीमुळे शेजारी होते त्रस्त 

 

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पत्नी, मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत: आत्महत्या करणारा क्ररकर्मा आलोक दुहेरी व्यक्तिमत्त्व जगत होता. एकीकडे तो वस्तीमध्ये कुणी आवाज दिला तरी बोलायचे टाळत असे तर अमिषाच्या घरी मात्र तो गोेंधळ घालत भांडण करायचा. अमिषाचे शेजारीसुद्धा त्यांच्या नेहमीच्या भांडणांमुळे त्रस्त झाले होते. अमिषाची आई नेहमी शिवीगाळ करीत असल्याने शेजाऱ्यांनी त्या दोघींसोबत अंतर राखून ठेवले होते. त्यामुळेच रविवारी रात्री अमिषा आणि आलोकमध्ये सुरू असलेल्या भांडणांचा आवाज ऐकू येत असतानाही शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

या नरसंहारानंतर बागल अखाडा, पटवी मंदिर गल्लीतील वस्तीसह संपूर्ण पाचपावली परिसरात इतकी दहशत पसरली आहे की, आलोक व अमिषाच्या शेजाऱ्यांना प्रत्येक वेळी काहीतरी अपरिचित घडेल की काय, अशी भीती आहे. काही लोकांनी तर पत्नी आणि मुलाबाळांना दूर नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे. वस्तीतील गल्ल्यांमध्ये खेळत असलेल्या मुलांचे ओरडणेही आता ऐकायला येत नाही. लोकमतने बुधवारी या परिसरातील लोकांशी चर्चा केली असता अनेक आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे आली. एक काळ असा होता जेव्हा अमिषा भाऊजी आलोकच्या खूप जवळ होती. त्याच्या व्यवसायात ती मदत करायची तर तिची आई शिलाईचे काम करायची. अमरावती येथून आल्यानंतर त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता. गेल्या पाच-सहा महिन्यापासून त्यांचे नाते अतिशय तणावपूर्ण झाले. आलोक जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा अमिषाच्या घरी येऊन वाद घालू लागला. छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांपासून काहीही लपून नव्हते. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी बाहेर आले की, लक्ष्मीबाई त्यांना शिवीगाळ करीत अपमानित करायची. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या भांडणाकडे लक्ष देणे सोडून दिले होते. अन्यथा रविवारी त्याच दिवशी हत्येची घटना उघडकीस आली असती.

आलोक जेव्हाही घरी येऊन वाद घालायचा तेव्हा लक्ष्मीबाई दरवाजा बंद करून घ्यायची. परत जाताना कुणी शेजारी दिसलाच तर आलोक त्यांना चिडवायचा. यावर शेजाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता. रविवार २० जून रोजी रात्री ११ वाजता आलोक अमिषाच्या घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाचा आवाज एका शेजाऱ्याला ऐकू येत होता. परंतु रोजचाच तमाशा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.

अमिषाचे शेजारी ज्याचा खूप राग करायचे तो आलोक त्याच्या स्वत:च्या वस्तीमध्ये मात्र शांत स्वभावाचा होता. शेजाऱ्यांशी त्याची बोलचालही खूप कमी होती. पत्नी आणि मुलांना तो बाहेरही जाऊ देत नव्हता. याचे कारण विचारले असता विजयाने शेजारी महिलांना तो शंकेखोर वृत्तीचा असल्याचे सांगितले होते. आलोक मुलगी परीला ट्युशनला सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी स्वत: जायचा. काही दिवसांपूर्वीच तो मुलीला दुचाकी चालवणे शिकवत होता. मुलगा साहीलसोबत गल्लीत क्रिकेटही खेळायचा. आपल्या घराची व कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून वस्तीतील लोक त्याला ओळखायचे.

 आमचे जगणे हराम केले

आलोकची पत्नी विजया अमिषावर खूप नाराज होती. तिने आमचे जगणे हराम केले असल्याचे विजया आपल्या महिला मैत्रिणींना सांगायची. अमिषाने अनेकदा आलोकच्या घरी येऊन भांडणही केले होते. तेव्हा विजया शिलाईच्या पैशावरून वाद असल्याचे शेजाऱ्यांना सांगायची. दोन महिन्यांपूर्वी आलोकने मोबाईल हिसकावला तेव्हाही अमिषाने आलोकच्या घरासमोर तमाशा केला होता. त्यावेळी विजया तिला घरात घेऊन गेली होती.

 वस्तीच्या नावाला काळीमा फासला

ज्या वस्तीत ही घटना घडली ती गरीब व मध्यमवर्गीय लोकांची वस्ती आहे. येथील लोकांसाठी खून किंवा मारहाण नवीन नाही. प्रत्येक गल्लीत दोन-चार दबंग वृत्तीचे लोक आहेत. परंतु या नरसंहाराची चर्चा करताच लोक संतापून जातात. त्यांचे म्हणणे आहे की, लहान मुलांची हत्या करून आलोकने वस्तीच्या नावाला काळीमा फासला आहे. प्रत्येक घरात मुली आहेत, परंतु कुणीची हिंमत नाही की त्यांच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू शकेल. मात्र वासनेने पछाडलेल्या आलोकने सर्वच हद्द पार केली.

 अमरावतीतही झाले होते भांडण

असे सांगितले जाते की, आलोक व अमिषा यांच्यात अमरावतीमध्येही वाद झाला होता. विजयाने आपल्या महिला मैत्रिणींना याबाबत सांगितले होते. त्या नरसंहाराच्या तीन दिवसांपूर्वीच आलोक व अमिषा अमरावतीला गेले होते. गेल्या आठवड्यात आलोकने लिपस्टीक-नेलपॉलिसचा बॉक्स आणि हेअर मशीन खरेदी केली होती. आलोक स्वत:सह आपल्या कुटुंबालाही स्टायलिश ठेवायचा. नागपूरला आल्यानंतरही आलोकला गारमेंट शिलाईचे काम नियमितपणे मिळत होते.

Web Title: Nagpur massacre; Murderer Alok was a live double personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.