नागपूरच्या महापौरांची निवड २२ नोव्हेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:34 AM2019-11-15T11:34:58+5:302019-11-15T11:35:20+5:30
येत्या २२ नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवड सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊन हॉलमध्ये होईल.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर नंदा जिचकार यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ व वाढीव कार्यकाळही संपला आहे. बुधवारी महापौर आरक्षणाची सोडतही निघाली. येत्या २२ नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवड सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊन हॉलमध्ये होईल. महापौर निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. नवीन महापौर हा ५३ वा राहिल. महापालिकेत १५१ जागेपैकी १४९ नगरसेवक आहे. दोन जागा रिक्त आहे. तरीही भाजपाजवळ १०६ नगरसेवक आहे. काँग्रेसजवळ २९, बसपा १०, शिवसेना २, राष्ट्रवादी १ व १ अपक्ष नगरसेवक आहे. त्यामुळे महापौराची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे.