नागपूरच्या महापौरांचा विदेश दौरा वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:14 AM2018-09-17T01:14:52+5:302018-09-17T01:15:16+5:30
विरोधकांची टीका; खासगी सचिव म्हणून मुलालाही सोबत नेले
नागपूर : महापौर नंदा जिचकार यांनी अमेरिकेला दौऱ्यावर जाताना खासगी सचिव म्हणून मुलाला सोबत नेल्याने त्यांचा हा दौरा चांगलाच वादात सापडला आहे. हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेसाठी त्या सॅनफ्रॅन्सिस्को येथे गेल्या आहेत.
महापौर नंदा जिचकार यांना ग्लोबल कोवेनंट आॅफ मेयर फॉर क्लायमेट अॅन्ड एनर्जी या संस्थेने हवामान व ऊर्जा बदलावर आधारित जागतिक परिषदेसाठी आमंत्रित केले. ही परिषद यूएसमधील सॅनफ्रान्सिस्को येथे १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी जिचकार ११ सप्टेंबरला सॅनफ्रान्सिस्कोकडे रवाना झाल्या. मात्र, त्यांनी सोबत मुलगा प्रियांशला खासगी सचिव म्हणून दौºयावर नेले आहे. महापालिकेत सचिव असताना त्यांनी मुलाला खासगी सचिव म्हणून कसे नेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या ११ महिन्यांत महापौर सहा वेळा विदेशवाºया केल्या आहेत. ‘मुलाला खासगी सचिव दर्शवून नेताना प्रशासनाला चुकीची माहिती देणे योग्य नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.
दौरा महापालिकेच्या पैशातून नाही
हा दौरा संस्थेने प्रायोजित केलेला होता. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे त्या जाण्यास तयार नव्हत्या. तेव्हा तुम्ही केअरटेकर म्हणून कुणालाही सोबत आणू शकता, अशी सूचना आयोजकांनी केल्याने महापौर मुलाला घेऊ न विदेश दौºयावर गेल्या, असे महापौरांचे पती शरद जिचकार यांनी सांगितले.