Nagpur: मनपाच्या सुपरवायझरकडून ९० लाखांची एमडी जप्त

By योगेश पांडे | Published: August 21, 2024 04:52 PM2024-08-21T16:52:17+5:302024-08-21T16:52:32+5:30

Nagpur Crime News: नागपुरात एमडी खरेदीविक्रीचे प्रमाण वाढले गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ९० लाखांची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या एका सुपरवायझरचादेखील समावेश आहे.

Nagpur: MD of 90 lakhs seized from municipal supervisor | Nagpur: मनपाच्या सुपरवायझरकडून ९० लाखांची एमडी जप्त

Nagpur: मनपाच्या सुपरवायझरकडून ९० लाखांची एमडी जप्त

-योगेश पांडे 
नागपूर - नागपुरात एमडी खरेदीविक्रीचे प्रमाण वाढले गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ९० लाखांची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या एका सुपरवायझरचादेखील समावेश आहे. त्याच्याविरोधात अगोदरदेखील एनडीपीएसअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. सकाळच्या सुमारास हिवरीनगर परिसरात एमडीची खरेदीविक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व हिवरीनगर बगिच्यासमोरील लोहाना भवनाजवळ कपिल गंगाधर खोब्रागडे (४०, राजेंद्र नगर झोपडपट्टी ,आंबेडकर चौक), राकेश अनंतराव गिरी (३१, नंदनवन झोपडपट्टी) व अक्षय बंडू वंजारी (२५, जुना बगडगंज, बजरंगनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून ९०.७० लाख रुपये किंमतीची ९०७ ग्रॅम पावडर आढळली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाईल व वजनकाट्यासह ९१.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कपिल हा मनपाच्या आरोग्य विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस अंतर्गत अगोदर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. राकेशविरोधातदेखील दोन गुन्हा दाखल आहेत.

अक्षय हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरोधात एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात एक एनडीपीएसचा गुन्हा आहे. या खरेदीविक्रीच्या रॅकेटमध्ये मध्यप्रदेशातील सारंगपूर येथील सोहेल, टेका-ताजनगरमधील मकसूद अमीनुद्दीन मलिक, गोलू बोरकर (हिवरेनगर), अक्षय बोबडे (हिंगणा), अल्लारखा (हिंगणा) हेदेखील सहभागी आहेत. त्यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. मकसूद हा सराईत ड्रगडीलर आहे. त्याच्याविरोधात एकूण १४ गुन्हे दाखल असून पाच गुन्हे एनडीपीएसअंतर्गत आहेत. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, मनोज नेवारे, पवन गजभिये, शैलेश डोबोले, रोहीत काळे, राहुल पाटील, शेषराव रेवतकर, सुभाष गजभिये व सहदेव चिखले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Nagpur: MD of 90 lakhs seized from municipal supervisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.