नागपुरात रात्री पारा घसरला, दिवसा उन्हात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 11:46 PM2021-04-02T23:46:10+5:302021-04-02T23:47:18+5:30
Temprature, Nagpur शहरात गेल्या २४ तासात रात्रीच्या तापमानात ६ अंशाची घट नाेंदविण्यात आली आहे. किमान तापमान सामान्यापेक्षा २ अंशाने घटून २०.३ अंशाची नाेंद करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात गेल्या २४ तासात रात्रीच्या तापमानात ६ अंशाची घट नाेंदविण्यात आली आहे. किमान तापमान सामान्यापेक्षा २ अंशाने घटून २०.३ अंशाची नाेंद करण्यात आली. दिवसाचे तापमान सामान्यापेक्षा १ अंशाने वाढून ४० अंशावर पाेहचले. आकाशात थाेडे ढगही दाटले हाेते, पण उष्ण वाऱ्याचा तडाखा कायम हाेता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान व दक्षिण ओरिसा भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मध्य भारतातील हवामानावर परिणाम झाला आहे. यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानवाढीवर ब्रेक लागला आहे. शुक्रवारी नागपुरात ५.४ किमी प्रतितास वेगाने उत्तर-पूर्व दिशेकडून हवा वाहत हाेती. यामुळे दिवसा उष्णता जाणवत राहिली. विदर्भात ४३.६ अंशासह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण ठरला. त्याखालाेखाल ब्रह्मपुरीचे तापमान ४२.२ अंश नाेंदविण्यात आले. मात्र इतर जिल्ह्यात पारा ४२ अंशाच्या खाली आला. दाेन दिवसापूर्वी बहुतेक जिल्ह्यात तापमान ४२ अंशावर पाेहचला हाेता. गुरुवारी रात्री अचानक वातावरणात बदल दिसून आला. त्यामुळे किमान तापमान ६ अंशाने खाली घसरले. सामान्यापेक्षा २ अंश घटल्याने दिलासा मिळाला. सकाळी ऊन निघाले. त्यामुळे सकाळी ८.३० वाजता आर्द्रता २७ टक्के तर सायंकाळी ५.३० वाजता २२ टक्के आर्द्रता नाेंदविण्यात आली.
सामान्य राहील तापमान
हवामान विभागानुसार आकाशात थाेडे ढग दाटलेले असतील. येत्या चार दिवसात पारा ४१ ते ४२ अंशावर राहील. रात्रीही तापमान सामान्यस्तराच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सायक्लाेनिक सर्क्युलेशनचा प्रभाव कमी पडल्यानंतर तापमानात आणखी वाढ हाेण्याचा अंदाज आहे.