Nagpur: मोदी, योगी आणि श्रीराम मंदिराच्या पतंगांची धूम, पतंग-मांजाची २० कोटींची उलाढाल

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 14, 2024 09:46 PM2024-01-14T21:46:22+5:302024-01-14T21:46:38+5:30

Nagpur News: मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवारी बाजारात पतंग आणि मांजा खरेदीसाठी ग्राहकांची विशेषत: युवा वर्गाची झुंबड उडाली. नागपूरची मुख्य बाजारपेठ इतवारी आणि सक्करदरा मार्गावरील जुनी शुक्रवारीत पतंग व मांजा विक्रीची १५० हून अधिक दुकाने सजली आहे.

Nagpur: Modi, Yogi and Sriram temple kites fly, kite-manja turnover of 20 crores | Nagpur: मोदी, योगी आणि श्रीराम मंदिराच्या पतंगांची धूम, पतंग-मांजाची २० कोटींची उलाढाल

Nagpur: मोदी, योगी आणि श्रीराम मंदिराच्या पतंगांची धूम, पतंग-मांजाची २० कोटींची उलाढाल

- मोरेश्वर मानापुरे 
नागपूर - मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवारी बाजारात पतंग आणि मांजा खरेदीसाठी ग्राहकांची विशेषत: युवा वर्गाची झुंबड उडाली. नागपूरची मुख्य बाजारपेठ इतवारी आणि सक्करदरा मार्गावरील जुनी शुक्रवारीत पतंग व मांजा विक्रीची १५० हून अधिक दुकाने सजली आहे. सोमवारीही मांजा आणि पतंगांना मोठी मागणी राहील. यंदा मांजा आणि पतंगांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढल्यानंतरही यंदा नागपुरात २० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. 

नागपुरात बरेली मांजासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अयोध्याच्या श्रीराम मंदिराचे चित्र रेखांकित केलेल्या पतंगांना सर्वाधिक मागणी आहे. तसेच मोदी आणि योगींचे एकत्रित चित्र असलेले आणि वंदे मातरम् असा देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या पतंगांची यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच प्लास्टीकच्या पतंगांमध्ये विविध कार्टून पतंगाला अधिक मागणी आहे.

तरुणाई नव्या गाण्यांसह जुन्या गाण्यांवरही थिरकणार
नागपुरात मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सवाची धूम पहावयास मिळते. अनेक ठिकाणी सामूहिकरित्या तर काही ठिकाणी वैयक्तिकरित्या घराच्या छतांवर डीजे अथवा ध्वनिक्षेपक लावून तरुणाई नव्या गाण्यांसह जुन्या गाण्यांवरही थिरकतांना दिसून येतात. नागपुरात वितरक आणि विक्रेत्यांची मकरसंक्रांतीच्या एक महिन्याआधीपासूनच पतंगोत्सवाची तयारी सुरू केली. सूरज, अहमदाबाद आणि अन्य ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची खरेदी करून नागपुरात विक्री करण्यात येत आहे. तसेच नागपुरातही विविध प्रकारच्या पतंगांची निर्मिती करण्यात येते. हा व्यवसाय दरवर्षी वाढतच आहे. प्लास्टीक पतंग दिसायला आकर्षक असली तरी अनेकांकडून मात्र कागदी पतंगाची मागणी सर्वाधिक केली जाते. प्लास्टीक आणि कागदी पतंग शेकडा एक हजार ते पाच हजार या भावाने विक्री केली जाते. आकारानुसार पतंगाचे दर वाढत असतात. मोठ्या कागदी तावाच्या पतंगाचे दर ५०० रुपयांपर्यंत आहेत. मांजा खरेदीसाठीही तेवढीच गर्दी आहे. वारानुसार मांजाचे एका चक्रीचे दर ३०० रुपये ते दोन हजार रूपयांपर्यंत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत दोऱ्याच्या दरात ३० टक्के दरवाढ झाली आहे.

युवती आणि महिलांचा पतंग खरेदीकडे ओढा
युवा आणि पुरुषांच्या तुलनेत युवती आणि महिलांही पतंगोत्सव साजरा करण्यात मागे नाहीत. यंदा जुनी शुक्रवारी पतंग बाजारात लहानांसोबत महिलाही पतंग आणि मांजा खरेदी करताना दिसून आल्या. लहानांसोबत आणि एकत्रितरीत्या पतंगोत्सव साजरा करणार असल्याचा महिलांचा मानस दिसत आहे. हा ट्रेड दरवर्षी वाढतच आहे.

Web Title: Nagpur: Modi, Yogi and Sriram temple kites fly, kite-manja turnover of 20 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर