मुंबईतील शाळांना आज सुट्टी नाही - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:28 AM2018-07-10T10:28:31+5:302018-07-10T10:38:29+5:30

पाणी साचून विद्यार्थी अडकण्याची भीती नाही

Nagpur Monsoon Session 2018 : Mumbai schools do not have a holiday today - Vinod Tawde | मुंबईतील शाळांना आज सुट्टी नाही - विनोद तावडे

मुंबईतील शाळांना आज सुट्टी नाही - विनोद तावडे

googlenewsNext

नागपूर - मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला नाही. पाणी साचून विद्यार्थी अडकण्याची भीती नाही त्यामुळे मुंबईतील शाळा आणि कॉलेज सुरु राहणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

मुंबईत मुसळधार पाऊस असताना मंत्रिमंडळातील कोणीच मुंबईत गेले नाही, आज तेथील शाळांना सुटी द्यायला हवी होती, मदत यंत्रणांचा आढावा घ्ययला हवा होता, पण सरकारने यातले काहीच केले नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले. विरोधकांनी पॅनिक होण्याची गरज नाही, मुंबईत फक्त मुसळधार पाऊस आहे, ढग फुटी झालेली नाही, आम्ही तेथील परिस्थितीवर  लक्ष ठेवून आहोत. गरज पडल्यास सर्व मत्रिमंडळ मुंबईत जाऊ शकते असे उत्तर विनोद तावडे यांनी लगेच सभागृहात जाण्यापूर्वी  दिले. 

दरम्यान, अतिपावसामुळे आणि शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण मुंबईतील बहुतेक शाळांच्या सकाळच्या सत्रामधील वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 165.8 मिमी तर उपनगरात 184.3 मिमी पावसाची नोंद, विरारमध्ये 24 तासात 235 मिमी तर वसईत पाऊस 299 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आज पाऊस कमी असल्यामुळे शाला सुरु राहणार आहेत. 

 

Web Title: Nagpur Monsoon Session 2018 : Mumbai schools do not have a holiday today - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.