जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅकला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 09:53 PM2022-12-20T21:53:47+5:302022-12-20T21:54:51+5:30
Nagpur News चिंचभवन जलकुंभावरून येणारी ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर मंगळवारी दुपारी इंगोलेनगर रेल्वे ट्रॅकजवळ मोठी गळती दिसून आहे. ही गळती दुरुस्त न केल्यास नजीकच्या नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅकला धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
नागपूर : चिंचभवन जलकुंभावरून येणारी ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर मंगळवारी दुपारी इंगोलेनगर रेल्वे ट्रॅकजवळ मोठी गळती दिसून आहे. ही गळती दुरुस्त न केल्यास नजीकच्या नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅकला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. या कामाकरिता नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी बुधवारी आकस्मिक शटडाऊन करून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करणार आहे.
चिंचभवन जलकुंभावरून सूरज सोसायटी, श्यामनगर, जयदुर्गा सोसायटी ३,४,५,६, संताजी सोसायटी, न्यू लोककल्याण सोसायटी, साईप्रभा सोसायटी, शिल्पा सोसायटी, कन्नमवारनगर, इंगोलेनगर, सूरज सोसायटी, चिंचभवन, न्यू मनिषनगर, जयहिंद सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, राजगृह सोसायटी, गीतांजली सोसायटी, पायल-पल्लवी सोसायटी, कैकाडीनगर, ओमशांती गृहनिर्माण सोसायटी, मेहेरबाबा सोसायटी, गिरीकुंज सोसायटी, कचोरे पाटील नगर लेआऊट, चिखली लेआऊट, जुनी वस्ती चिंचभवन, उदय सोसायटी आणि वैशालीनगर आदी भागाला पाणीपुरवठा होतो. गळतीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असून, दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा नियमित होणार आहे. विशेष म्हणजे आकस्मिक शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.