पश्‍चिम विदर्भातील कॅन्सर रुग्णांना नागपूर, मुंबईचाच आधार !

By admin | Published: February 4, 2016 01:17 AM2016-02-04T01:17:08+5:302016-02-04T01:17:08+5:30

शासकीय रुग्णालयांमध्ये कर्करोगावर पुरेशी उपचार सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड.

Nagpur, Mumbai support for cancer patients in Vidarbha | पश्‍चिम विदर्भातील कॅन्सर रुग्णांना नागपूर, मुंबईचाच आधार !

पश्‍चिम विदर्भातील कॅन्सर रुग्णांना नागपूर, मुंबईचाच आधार !

Next

खामगाव: पश्‍चिम विदर्भातील शासकीय रुग्णलयांमध्ये कर्करोगावर पुरेशी उपचार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांना नागपूर, मुंबई येथेच उपचारासाठी धघव घ्यावी लागते. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी या भागात अत्याधुनिक सुविधेसह कर्करोग निदान, उपचार व्यवस्था करण्याची गरज आहे.
वाढती व्यसनाधीनता आणि धकाधकीच्या जीवनात दैनंदिन आहारातील बदलामुळे कर्करोगासोबतच इतरही आजार बळावत आहेत. आजार वाढत असतानाच, त्या तुलनेत उपचार आणि सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना सोयीसवलती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शासनाकडून जीवनदायी योजनांच्या माध्यमातून उपचारासाठी सुविधा पुरविण्यात येतात. मात्र, पश्‍चिम विदर्भातील कॅन्सरसारख्या आजारावर उपचार मिळत नसल्याने, रुग्णांना उपचारासाठी प्रवास आणि इतर गरजांवर खर्च करावा लागतो. कर्करोगासारख्या आजाराचे लवकर निदान झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. कॅन्सर रुग्णालयसाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याच्या भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.

कॅन्सरचे प्रकार!
कॅन्सरच्या रुग्णांमध्ये गर्भाशय पिशवी, फुफ्फुस, स्तन, अन्ननलिका आणि मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. श्रीमंत, मध्यवर्गीयांसह सर्वसामान्य मजूरवर्गांमध्येही या कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळून येते.

Web Title: Nagpur, Mumbai support for cancer patients in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.