नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या प्रभागानुसार आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 03:24 PM2022-05-31T15:24:08+5:302022-05-31T16:42:42+5:30
आरक्षणामुळं अनेक प्रभाग रचना आणि वॉर्ड रचनेत बदल झाल्यानं अनेकांची अडचण झाली आहे.
नागपूर : येथील महापालिका निवडणुकीसाठी महिलाआरक्षणाची सोडत आज (दि. ३१) ला रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरकिता आरक्षित वार्ड ईश्वर चिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले.
त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या नागपूर महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येच्या आधारावर प्रभागनिहाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ५० टक्के वार्ड आरक्षित आहेत. यात १६ प्रभागात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित निघाली. ६ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या. तर, ५६ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
दरम्यान, यंदा चारऐवजी तीन वॉर्डचा प्रभाग झाल्याने प्रभागांची संख्या ३८ वरून ५२ तर नगरसेवकांची संख्या १५१ वरून १५६ झाली आहे. या आरक्षण सोडतीत काहींना दिलासा मिळाला असला तरी मागील पाच वर्षे सत्तेत असलेले भाजपमधील माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या २३ क्रमांकाच्या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गात दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण निघाले आहे.
असे आहे आरक्षित प्रभाग
अनुसूचित जाती (महिला)
या १६ जागांसाठी असलेल्या सोडतीत प्रभाग क्र. २ मधील जागा क्र अ, प्रभाग क्र. १० मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. ४३ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १३ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, २० मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३० मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र २७ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र ३९ मधील जागा क्र. १६, प्रभाग क्र. १६ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३७ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ४५ मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. १ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १४ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३८ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १५ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ५२ मधील जाग क्र. अ यांचा समावेश
अनुसूचित जमाती (महिला)
अनुसूचित जामाती महिलांकरिता प्रभाग क्र २४ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ११ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३७ मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. १२ मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. ४ मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. ५१ मधील जाग क्र. ब चा समावेश
सर्वसाधारण गट (महिला)
इश्वर चिठ्ठीद्वारे सोडविण्यात आलेल्या महिला प्रभागांमध्ये प्रभाग ३१ मधून जागा क्र. ब, प्रभाग २२ मधून जागा क्र. ब, प्रभाग २३ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४० मधून जागा क्र. ब, प्रभाग ३२ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४९ मधून जागा क्र. ब, प्रभाग २९ मधून जाग क्र. ब, प्रभाग ४५ मधून जागा क्र. ब, प्रभाग १७ मधून जागा क्र. ब, प्रभाग १७ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४८ मधून जाग क्र. ब, प्रभाग ६ मधून जागा क्र. ब, प्रभाग २ मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.