नागपूर मनपात भाजपाला धक्का; घडले ‘परिवर्तन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 09:28 PM2018-03-14T21:28:20+5:302018-03-14T22:04:09+5:30

राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर धक्का देत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे.

In Nagpur Municipal Corporation BJP shocked ; The 'change' happened | नागपूर मनपात भाजपाला धक्का; घडले ‘परिवर्तन’

नागपूर मनपात भाजपाला धक्का; घडले ‘परिवर्तन’

Next
ठळक मुद्देईश्वर चिठ्ठीतही सत्तापक्षाला दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर धक्का देत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे. ७५ सदस्यांपैकी अपना पॅनलचे ३३ तर परिवर्तन पॅनलचे ४२ सदस्य निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून संघटनेचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. पण कार्याध्यक्ष राजेश हातीबेड हेच कामकाज बघत होते. अपना पॅनलचा पराभव झाल्याने आता अध्यक्षपदावरून फडणवीस यांचे नाव हटणार आहे. परिवर्तन पॅनलने सुरेंद्र टिंगणे यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.
१० मार्चला कर्मचारी संघटनेच्या ५२ जागांपैकी ४२ जागांसाठी मतदान झाले. यात १७०० मतदारांनी मतदान केले. अपना पॅनलला १६जागा तर परिवर्तन पॅनलला २५ जागा मिळाल्या. उर्वरित ११ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यात अपना पॅनलला ९ तर परिवर्तन पॅनलला २ जागा मिळाल्या होत्या. अशा प्रकारे अपना पॅनलच्या २५ तर परिवर्तनच्या २७ जागा निवडून आल्या. मात्र दोन सदस्य अपना पॅनलच्या गोटात गेल्याने परिवर्तनची चिंता वाढली होती. यातील एक सदस्य परत आला. त्यानंतर कार्यकारी मंडळाच्या १८ जागांसाठी निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान केले. दोन्ही पॅनलच्या प्रत्येकी २ उमेदवारांना २७ मते मिळाली तर उर्वरित १६ जणांना प्रत्येकी २५ मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने कौल घेण्यात आला. यात अपना पॅनलला ५ तर परिवर्तनला ९ जागा मिळाल्या. अशा प्रकारे अपना पॅनलला ७ तर परिवर्तन पॅनलला ११ जागा मिळाल्या. तर पाच स्वीकृत सदस्य परिवर्तन पॅनलचे निवडून आले. त्यामुळे एकूण ७५ सदस्यांपैकी ३३ सदस्य अपना पॅनलचे तर ४२ सदस्य परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता असताना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या कर्मचारी संघटनेला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.
असे आहेत नवनिर्वाचित सदस्य
परिवर्तन पॅनल : रंजन नलोडे, दिलीप निखाडे, नारायण वानखेडे, मारोती नासरे, मंजुश्री कान्हेरे, मिलिंद चकोले, बळवंत गजबे, भीमराव लांडगे, बळीराम शेंडे, राजू नन्नावरे, सुनील दातार, सत्यवान मेश्राम, योगेश नागे, विलास येवले, गौतम गेडाम, बाबा श्रीखंडे, योगेश बोरकर, शीतल जांभूळकर, संजय मोहले, देवानंद वाघमारे, संजय शिंगणे, विलास चहांदे, एस.पी. मौंदेकर, सीमा मेश्राम, मंगेश देशपांडे, प्रतिनिधींच्या जागांवर पुरुषोत्तम कैकाडे, संजय गाटकिने, विजय लुटे, मेहराज शिंदेकर, मोहन टाकभवरे, विश्वास सेलसूकर, पुष्पा शर्मा, मनोहर महाकाळकर, सय्यद मुजहर अली, प्रफुल टिंगणे व प्रेमचंद अडकिने आदींचा समावेश आहे. स्वीकृत सदस्यांत सुरेंद्र टिंगणे, सुदाम महाजन, ईश्वर मेश्राम, प्रवीण तंत्रपाळे, राजपाल खोब्रागडे आदींचा समावेश आहे.
अपना पॅनल : श्रीकांत वैद्य, अमोल तपासे, गणराज महाडिक, शंकर हजारे, प्रशांत डुडुरे, सुरेंद्र दुधे, राजू लोणारे, किशोर तिडके, राजेश कछवाह, राजेश हाथीबेड, शिवकुमार नायडू, गजानन जाधव, विनय पाटील, सतीश सोलंकी, संजय बागडे, विशाल शेवारे, प्रदीप खोब्रागडे, गणेश मिराशे, राजेंद्र पाटील, अमोल चोरपगार, उमेश भदाळे, झडू मोहाडीकर, आशिष तालेवार, नितीन वैद्य, गणेश मेसरे, लीलाधर पाटील, नंदू पेकडे, सहयोगी सदस्यांत काजी फिरोज, वंदना म्हैसकर, अभय बुराडे, मीना नकवाल, अनिल निभोंजकर, सुनील मेश्राम व विशाल ढोणे आदींचा समावेश आहे.
आता न्यायासाठी संघर्षाची भूमिका
गेल्या तीन वर्षांत कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षक संघाने परिवर्तन पॅनलच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली. विविध संघटना एकत्र आल्या. आता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटना सर्वांना विश्वासात घेऊन आंदोलनाचा निर्णय घेईल.
राजेश गवरे, अध्यक्ष मनपा शिक्षक संघ

Web Title: In Nagpur Municipal Corporation BJP shocked ; The 'change' happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.