नागपूर महापालिका : शपथपत्रावर सादर करा वाहनांची, कर्मचाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:19 PM2021-06-11T22:19:39+5:302021-06-11T22:21:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर स्वच्छतेच्या कार्यामध्ये सुसूत्रता यावी व नागरिकांना सुलभता निर्माण व्हावी याकरिता नागपूर महापालिकेद्वारे एजी ...

Nagpur Municipal Corporation: Submit information of vehicles and employees on affidavit | नागपूर महापालिका : शपथपत्रावर सादर करा वाहनांची, कर्मचाऱ्यांची माहिती

नागपूर महापालिका : शपथपत्रावर सादर करा वाहनांची, कर्मचाऱ्यांची माहिती

Next
ठळक मुद्देअविनाश ठाकरे यांचा एजी आणि बीव्हीजी कंपन्यांना दणका महापौरांद्वारे गठित समितीपुढे सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर स्वच्छतेच्या कार्यामध्ये सुसूत्रता यावी व नागरिकांना सुलभता निर्माण व्हावी याकरिता नागपूर महापालिकेद्वारे एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन कंपन्या कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या कामाच्या संदर्भात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे शपथपत्राद्वारे प्रशासनाकडे सादर करणे तसेच प्रशासनाने दहाही झोनकडून प्राप्त माहितीच्या आधारे एकूणच कार्यप्रणालीचा सविस्तर अहवाल समितीपुढे सादर करावा, असे निर्देश सत्तापक्ष नेते तथा गठित समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले.

एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीच्या कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्यावर होणारी कारवाई तसेच कंपनीद्वारे बेकायदेशीर काम होत असल्यास नियमाप्रमाणे कारवाई करणे याकरिता महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. समिती गठित करण्याचे आश्वासन महापौरांनी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांच्या स्थगन प्रस्तावावर सर्व साधारण सभेमध्ये दिले होते. या समितीद्वारे शुक्रवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये दोन्ही कंपन्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, सदस्य नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, सदस्य उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यासंदर्भात मनपा प्रशासनाने दहाही झोनल अधिकाऱ्यांद्वारे सादर करण्यात आलेल्या माहितीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले. अहवालामध्ये प्रत्येक झोनमध्ये कंपनीकडे असलेली कर्मचारी संख्या, उपलब्ध साधनसामुग्री तसेच कामात अनियमितता झाल्यास आतापर्यंत ठोठावण्यात आलेले दंड याची सविस्तर माहिती सादर करण्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, समिती सदस्य नितीन साठवणे यांचे पत्र आणि बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांचे व्हिडिओ यासंदर्भात कंपनीने आपले म्हणने शपथपत्राद्वारे प्रशासनाकडे सादर करावे. प्रशासनाने त्यांच्या अहवालामध्ये या शपथपत्राचा समावेश करून सविस्तर अहवाल पुढील बैठकीपूर्वी समितीकडे सादर करावा, असेही निर्देश समितीने ठाकरे यांनी दिले.

अशी झाली सुनावणी

- प्रारंभी दोन्ही कंपनींच्या संदर्भात विरोधी पक्षनेते तानाजी वनवे तसेच नगरसेवक नितीन साठवणे यांच्याद्वारे दाखल तक्रार पत्राचे वाचन करण्यात आले.

-याशिवाय बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओ सुद्धा दाखविण्यात आले.

-यानंतर दहाही झोनकडून दोन्ही कंपनींच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कंपनीकडे असलेली कर्मचारी संख्या, कचरा गाड्या, छोट्या गाड्या, जेसीबी, टिप्पर, कॉम्पॅक्टर, रिक्षा आदींची माहिती झोनल अधिकाऱ्यांद्वारे झोननिहाय सादर करण्यात आली.

-यावेळी समिती सदस्य नितीन साठवणे यांनीसुध्दा दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारले.

Web Title: Nagpur Municipal Corporation: Submit information of vehicles and employees on affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.