नागपूर मनपा तीन महिन्यात लावणार ८२ हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 08:57 PM2019-06-11T20:57:18+5:302019-06-11T20:59:56+5:30

महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहरात तीन महिन्यात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहे. महापालिका १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अभियान राबविणार आहे. यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे सहकार्य घेणार आहे.

Nagpur Municipal Corporation will have 82 thousand plants in three months | नागपूर मनपा तीन महिन्यात लावणार ८२ हजार झाडे

नागपूर मनपा तीन महिन्यात लावणार ८२ हजार झाडे

googlenewsNext
ठळक मुद्दे१ जुलै ते ३० सप्टेबर दरम्यान अभियान: स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहरात तीन महिन्यात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहे. महापालिका १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अभियान राबविणार आहे. यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे सहकार्य घेणार आहे.
नागपूर शहरातील अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मनपा मुख्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. आयुक्त अभिजित बांगर, प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, दुर्बल घटक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, प्रवीण भिसीकर, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. श्रीनिवास, निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, वनस्पती शास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे, एसबीएम महाविद्यालयाचे अजिंक्य धोटे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आज प्रत्येकाने वृक्ष लावणे गरजेचे आहे. विकासासोबत वृक्षांची कत्तल होऊ नये, याची काळजीही घेतली पाहिजे. ‘ग्रीन सिटी’ म्हणून नागपूरला देशात क्रमांक एक करण्यासाठी १ जुलैच्या वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नंदा जिचकार यांनी यावेळी केले.
अभिजित बांगर म्हणाले, वृक्षलागवडीसोबतच असलेल्या वृक्षांचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यासाठी मनपाने धोरण तयार केले आहे. पण यापेक्षाही नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. झाड वाचविण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे, यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पर्यावरणप्रेमींनीही सूचना मांडल्या. यावेळी बोलताना वनस्पतीशास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे यांनी सध्या सुकलेल्या तलावातील माती काढून ती रस्ता दुभाजकांमध्ये टाका, शिवाय स्थानिक वृक्षांची लागवड करण्याची सूचना केली. ग्रीन फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटजी यांनी झाड लावण्यासोबतच झाड वाचविण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. जी झाडे लावलीत तिला जगविणे आणि जी आहेत त्याचेही जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
वृक्षलागवड मोहिमेचे सादरीकरण करण्यात आले. उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्षलागवड तयारी संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. ८२ हजार ५०० झाडांव्यतिरिक्त नागपूर शहरातील सिमेंट आणि डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा आणि रस्ता दुभाजकांवर ५० हजार झाडे लावण्याचेही प्रस्तावित असून त्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही उद्यान अधीक्षक चोरपगार यांनी यावेळी दिली.
स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नगरसेविका संगीता गिऱ्हे, नगरसेवक मुन्ना पोकुलवार, किशोर वानखेडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनाली कडू, आशा उईके, नगरसेवक निशांत गांधी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, हरीश राऊत, प्रकाश वराडे, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, स्मिता काळे यांच्यासह सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
झाडांच्या संगोपनावर विद्यार्थ्यांना गुण
विद्यापीठाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक रोपटे भेट म्हणून देण्यात येईल. तीन वर्षे त्याचे संगोपन त्याने करावे. त्यावर गुण देण्यात येईल, ही अभिनव संकल्पना विद्यापीठ अमलात आणणार असल्याचे प्रा. श्रीनिवास यांनी सांगितले. निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, एसबीएमचे अजिंक्य धोटे व अन्य प्रतिनिधींनीही यावेळी आपले विचार मांडले आणि वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

 

Web Title: Nagpur Municipal Corporation will have 82 thousand plants in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.