नागपूर मनपा करणार कडाेंमपाच्या प्लास्टिक विनिमयाचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:19+5:302020-12-23T04:07:19+5:30
मेहा शर्मा नागपूर : शहराच्या शाश्वत विकासासाठी चाैकटीबाहेरचा विचार करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे सर्व स्मार्टसिटी नवीन कल्पनांचा विचार करीत ...
मेहा शर्मा
नागपूर : शहराच्या शाश्वत विकासासाठी चाैकटीबाहेरचा विचार करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे सर्व स्मार्टसिटी नवीन कल्पनांचा विचार करीत आहेत. प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी कल्याण डाेंबिवली महापालिकेने अशाचप्रकारे प्लास्टिक कचऱ्याच्या माेबदल्यात जेवणाच्या कुपन्स देण्याची याेजना सुरू केली आहे. नागपूर महापालिकासुद्धा या याेजनेचा अभ्यास करणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबत संकेत दिले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक प्रदूषण वाढलेल्या ६० शहरांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत नागपूर शहर १६ व्या क्रमांकावर आहे. शहरात दरराेज ४५.९६ टन प्लास्टिक कचरा बाहेर निघताे. शहरातील एकूण कचऱ्यापैकी ७ टक्के कचरा प्लास्टिकचा असताे. एवढ्या माेठ्या प्रमाणात कचरा नष्ट करण्यासाठी सहाजिकच नवीन कल्पना आखणे आवश्यक आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, प्रत्येक शहराला बजेटनुसार काम करावे लागते. कडाेंमपाची याेजना अमलात आणण्यासाठी आर्थिक आणि इतर गाेष्टींचा विचार करणे गरजेचे असते. या गाेष्टींचा विचार केल्याशिवाय निर्णय घेणे याेग्य हाेणार नाही. कडाेंमपाची कल्पना चांगली आहे आणि आम्ही त्याबाबत अभ्यास करू. घनकचऱ्याची समस्या साेडविण्यासाठी मनपा नवीन कल्पना घेऊन येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
प्रयाेग करण्यात नुकसान नाही. मात्र ही याेजना राबविण्यासाठी याेग्य नियाेजन करणे गरजेचे ठरेल. प्लास्टिकचे विलगीकरण आणि प्लास्टिक स्वच्छता याबाबत लाेकांना जागृत करणे गरजेचे आहे. घन प्लास्टिकचा पुनर्वापर करणे व प्रक्रिया करणेही कठीण आहे. याेजनेची सुरुवात पूर्ण शहरात करण्यापेक्षा काही वाॅर्डात राबवावी आणि त्यात ८० टक्के यश मिळाले तर सर्वत्र विस्तार करावा. काहीतरी लाभ आहे, ही बाब लाेकांच्या मनात शिरणे आवश्यक आहे. मात्र याेजना राबविताना गाेळा हाेणारा प्लास्टिक कचरा नष्ट करण्याचीही याेजना आखणे गरजेचे आहे. लाेकांकडून गाेळा केल्यानंतर पुन्हा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकल्यास त्यांचा अर्थ हाेणार नाही. हा कचरा प्लास्टिक रिसायकलिंग इंडस्ट्रीलाही देता येऊ शकताे.
- जुई पांढरीपांडे, पर्यावरणवादी