नागपूर मनपाचा अर्थसंकल्प २,२७१ कोटींचा; खर्च केवळ ४५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:48 AM2018-03-06T00:48:17+5:302018-03-06T00:48:45+5:30

वर्षभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१७-१८ या वर्षाचा २,२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सोमवारी स्थायी समिती अध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातही जाधव यांनी वर्षभरात विकास कामावर ४०० कोटींचा खर्च झाल्याची माहिती आपल्या भाषणातून दिली.

Nagpur Municipal Corporation's budget of Rs 2,271 crore; The cost is only 450 crores | नागपूर मनपाचा अर्थसंकल्प २,२७१ कोटींचा; खर्च केवळ ४५० कोटी

नागपूर मनपाचा अर्थसंकल्प २,२७१ कोटींचा; खर्च केवळ ४५० कोटी

Next
ठळक मुद्देआर्थिक स्थितीमुळे मर्यादा : २०० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी तर २५० कोटींचे कार्यादेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१७-१८ या वर्षाचा २,२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यातील आस्थापना खर्च व कर्जावरील व्याज वगळल्यानंतरही १२०० ते १४०० कोटी विकास कामांसाठी शिल्लक राहतील. अर्थसंकल्पातील तरतुदींचा विचार करता शहरातील विकास कामांना गती मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र वर्षभरात जाधव यांच्या कार्यकाळात ४५० कोटी विकास कामावर खर्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील २५० कोटींच्याच कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. २०० कोटींच्या कामांना जेमतेम प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. सोमवारी स्थायी समिती अध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातही जाधव यांनी वर्षभरात विकास कामावर ४०० कोटींचा खर्च झाल्याची माहिती आपल्या भाषणातून दिली.
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा दावा महापालिका पदाधिकाºयांकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात तिजोरी खाली असल्याने विकास कामांना बे्रक लागल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीने वर्षभरात ५९८ प्रस्तावांना मंजुरी दिली. यात शहरातील दुसऱ्या  व तिसऱ्या  टप्प्यातील सिमेंट रोडच्या कामांचा समावेश आहे. अद्याप दुसऱ्या  टप्प्यातील रस्ते अर्धवट असून, तिसऱ्या  टप्प्यातील कामांना सुरुवातही झालेली नाही.
जाधव यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेली काही प्रमुख कामे व खर्च
-शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण २५ कोटी
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रम १९ कोटी
-पंडित दीनदयाल उपाध्याय रस्ते सुधार कार्यक्रम २८.४० कोटी
-नासुप्रतर्फे हस्तांतरित अभिन्यासातील कामे १५ कोटी
-सुरेश भट सभागृहाचे बांधकाम व लोकार्पण
-शहरातील विविध सभाजभवनाचे बांधकाम ४ कोटी
-क्रीडा विकास कार्यक्रमावरील खर्च ३ कोटी
-लक्ष्य अंत्योदय योजना, अपंग व दिव्यांगांसाठी ई-रिक्षा खरेदी
-शहरातील उद्यान व क्रीडांगणात लहान मुलांसाठी खेळणी १.२५ कोटी
-विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व दप्तर वाटप
-रिझर्व्ह बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान स्मारक बांधकामाला मंजुरी
-दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला मंजुरी
-विविध उद्यानांच्या विकासासाठी ६ कोटींच्या खर्चाला मंजुरी.
-घाटांचा विकास करण्यासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी.
-जोडरस्त्यावरील पूल बांधकामासाठी ५ कोटीला मंजुरी.
-शहरातील पुतळ्यांची दुरुस्ती व सौंदर्यीकणासाठी ७५ लाख.
-मोठ्या नाल्यांच्या संरक्षण भिंतींसाठी ७ कोटी.
-पावसाळी नाले ५ कोटी तर भूमिगत नाल्यांसाठी ७ कोटी.
-शहरालगतच्या हुडकेश्वर, नरसाळा भागाच्या विकासासाठी १२ कोटी.
बांधील खर्चाचा भार वाढला
जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य शासन महापालिकेला जीएसटी अनुदानाची रक्कम देत आहे़ महापालिकेने १०६५ कोटी रुपये वार्षिक अनुदानाची मागणी केली आहे़ प्रत्यक्षात तितके अनुदान मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे़ महापालिकेचे दरमहा ७८.८१ कोटी रुपये वेतन, निवृत्तिवेतन, विद्युत खर्च, कच्चे पाणी, ओसीडब्ल्यू, पेट्रोल, डिझेल, दूरध्वनी, कर्जाची परतफेड, जेएनएनयूआरएम प्रकल्प, कचऱ्याची उचल आदी बाबींवर खर्च होतो़ बँक आॅफ महाराष्ट्रकडून २०११-१२ मध्ये २०० कोटी, २०१४-१५ मध्ये २०० कोटी आणि २०१६-१७ मध्ये १०० कोटी असे एकूण ५०० कोटींचे कर्ज महापालिकने घेतले असून त्याचे व्याज भरावे लागते़. केंद्र सरकारच्या योजनातही वाटा द्यावा लागत आहे़

Web Title: Nagpur Municipal Corporation's budget of Rs 2,271 crore; The cost is only 450 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.