नागपूर मनपाची मालमत्ता करात ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 08:03 PM2017-12-30T20:03:59+5:302017-12-30T20:06:16+5:30

महापालिकेने केलेल्या कर पुनर्मूल्यांकनात मालमत्ता करामध्ये सुमारे पाच ते पंचेवीस पटीपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष पाहता माहापौरांनी अवाढव्य वाढ कमी करीत असल्याचे जाहीर केले. निर्धारणाची प्रक्रिया चुकीची असून शहरातील हे कृत्य जुलमी राजवटीचे द्योतक आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीने शनिवारी महापालिकेच्या नगर भवनासमोर निदर्शने केली.

Nagpur Municipal Corporation's property tax does not increase by more than 50 percent | नागपूर मनपाची मालमत्ता करात ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नको

नागपूर मनपाची मालमत्ता करात ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नको

Next
ठळक मुद्देआम आदमी पार्टी आक्रमक : नगर भवनासमोर निदर्शने

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेने केलेल्या कर पुनर्मूल्यांकनात मालमत्ता करामध्ये सुमारे पाच ते पंचेवीस पटीपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा रोष पाहता माहापौरांनी अवाढव्य वाढ कमी करीत असल्याचे जाहीर केले. निर्धारणाची प्रक्रिया चुकीची असून शहरातील हे कृत्य जुलमी राजवटीचे द्योतक आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीने शनिवारी महापालिकेच्या नगर भवनासमोर निदर्शने केली.
आताचे सर्वेक्षण रद्द करून मालमत्ता कर २००८ च्या बेसरेटप्रमाणे लावावा. सूचनेसोबत घराचे स्केच, कराचे प्रमाण देण्यात यावे. सर्वांच्या मालमत्तेचे कर सर्वांना दिसण्याची आॅनलाईन पारदर्शक व्यवस्था करावी. नव्याने निर्धारित केलेल्या संपूर्ण कराची माहिती आॅनलाईन करून मनपाच्या वेबसाईटवर नागरिकांकरिता उपलब्ध करावी. ३१ मार्च म्हणजेच आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी २% व्याज आकारणे (सावकारी) बंद करावे. नव्याने निर्धारित केलेल्या संपूर्ण कराची माहिती पुस्तिका केवळ झोन कार्यालयात न ठेवता जेथे जेथे निवडणूक केंद्र असतात त्या सर्व केंद्रांवर एक आठवडा नागरिकांना तपासणी, निरीक्षणाकरिता ठेवावेत. या सोबतच आक्षेप नोंदणीसाठी त्या केंद्रांवर छापील अर्जांची व्यवस्था करावी.
याची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर करून जाहिरात द्यावी. वाहनांवर ध्वनी क्षेपणास्त्रे लावून मोहल्ल्या मोहल्ल्यात याचा प्रचार करावा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
मालमत्ता करातील १०० टक्क्यांपेक्षा जास्त केलेली वाढ त्वरित रद्द करून कमाल वाढ ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. असे न केल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनात अशोक मिश्रा, प्रशांत निलटकर, प्रमोद नाईक, डॉ. अशोक लांजेवार, अजय धर्मे, अंबरीश सावरकर, राजेश तिवारी, रवींद्र गिदोडे, हेमंत बन्सोड, शंकर इंगोले, गीता कुहीकर, शालिनी अरोरा, अमोल हाडके, विनोद अलमढोहकर, सुभद्रा यादव, देवा गौरकर, वसंतराव गाटीबाधे, पीयूष आकरे, जगजित सिंग, दिनेश पांडे, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Nagpur Municipal Corporation's property tax does not increase by more than 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.