नागपूर मनपातील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून वाढविले टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:39 PM2020-02-11T12:39:15+5:302020-02-11T12:41:06+5:30
नागपूर महापालिका शाळांतील शालार्थ प्रणालीत कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी १९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका शाळांतील शालार्थ प्रणालीत कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी १९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही यादी उपलब्ध करण्यात आली आहे. शिक्षण विभागातही ही यादी लावण्यात आली आहे. सोमवारी शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. यावर बुधवार १२ फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाकडे आक्षेप नोंदविता येईल. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची सुनावणी होणार नाही, असे यात नमूद केल्याने शिक्षकात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या २९ माध्यमिक शाळा आहेत. यातील १७ अनुदानित तर ११ शाळा विनाअनुदानित आहेत. शिक्षकांच्या नियुक्त्या करताना आस्थापनेचा घोळ व चुका केल्या. त्यामुळे शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्याप तयार करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकात शालार्थ प्रणातील कार्यरत असलेल्या फक्त चार शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरविताना काही निक ष ठरलेले आहेत. अशा निकषांचे पालन न करताच शिक्षकांना तडकाफडकी अतिरिक्त ठरविण्यात आल्याचा आक्षेप शिक्षक संघाने नोंदविला आहे.
अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकात निर्मला कॅजमीर, संजय पंडित, निलोफर परवीन मो. अर्शद, मानसी मुखर्जी, कमलाकर मानमोडे, रेजिना ए. नबीबेन, हिना चौधरी, वनिता काळे, पूजा भोयर, सुनील सरोदे, ज्योती नाईक, काजी नरुल लतीफ, सहीना शेख आरीफ अहमद, योगिता भूषणवार, उमा देशमुख, काजी महफूज अहमद, शाहीन रियाज शेख, नूरजहां जावेद जाफर, शमप्ता परवीन मन्सुरी, कमलेश बावणे व नाहीद जाफर आदींचा समावेश आहे.
शिक्षक ांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्याची शिक्षक संघटनेतर्फे वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु आस्थापनेत चुका व घोळ निर्माण केला असल्याने आजवर ही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. सेवाज्येष्ठता यादीच जाहीर केलेली नाही. तसेच परिपत्रकात शालार्थ प्रणालीत कार्यरत शिक्षकांचा अतिरिक्त शिक्षकात समावेश असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु अतिरिक्त ठरविण्यात आलेल्यांपैकी फक्त चारच शिक्षक शालार्थ प्रणालीत कार्यरत आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. काढण्यात आलेले परिपित्रक चुक ीचे व नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.
परिपत्रक नियमबाह्य व चुकीचे
माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता व आस्थापना यात शिक्षण विभागाने घोळ घातला आहे. शालार्थ प्रणातील कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु यातील चारच शिक्षक या प्रणातील कार्यरत आहेत. सोमवारी १० फेब्रुवारीला यादी जाहीर केली व बुधवारपर्यंत आक्षेपाला नोंदविता येतील, पण यावर सुनावणी नाही. कोणत्याही प्रक रणात संबंधितांना सुनावणीची संधी दिली जाते. परंतु येथे संधी नाकारली आहे. हा निर्णय चुक ीचा असल्याने तो शिक्षणाधिकाºयांनी मागे घ्यावा. शिक्षकांचे समायोजन करावे.
राजेश गवरे, अध्यक्ष,
ना.म.न.पा. शिक्षक संघ