नागपूरच्या मनपा रुग्णालयात अल्प दरात ४९ प्रकारच्या तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:04 PM2018-08-13T23:04:32+5:302018-08-14T00:06:33+5:30

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ रुग्णालये सुसज्ज करण्यात आलेली असून येथे ४९ प्रकारच्या तपासण्या २० ते १५० रुपये शुल्कात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारी महापालिकेच्या सदर येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते करण्यात आले.

Nagpur Municipal Hospital, at least 49 types of tests in low rate | नागपूरच्या मनपा रुग्णालयात अल्प दरात ४९ प्रकारच्या तपासण्या

नागपूरच्या मनपा रुग्णालयात अल्प दरात ४९ प्रकारच्या तपासण्या

Next
ठळक मुद्दे१० ते १५० रुपये शुल्क : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ रुग्णालये सुसज्ज करण्यात आलेली असून येथे ४९ प्रकारच्या तपासण्या २० ते १५० रुपये शुल्कात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारी महापालिकेच्या सदर येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते करण्यात आले.
महापालिक रुग्णालय व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना गरज असल्यास प्रयोगशाळा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त किंवा लघवीचे नमुने घेऊन केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करून रिपोर्टस् संबंधित रुग्णालयात पाठविला जाणार आहे. या सर्व चाचण्यांसाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. तपासणीसाठी नोंदणी शुल्क १० रुपये असून इतर तपासण्या २० रुपयांपासून ते जास्तीत जास्त १५० रुपयांपर्यंत आहेत. खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत अशा तपासणीसाठी हजारो रुपये द्यावे लागतात. महापालिका व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये ६ डिसेंबर २०१७ ला सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासह केंद्रीय प्रयोगशाळा उघडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात आले आहे.
महापालिकेतर्फे आरोग्य, शिक्षण यासारख्या अनेक सेवा दिल्या जातात. मात्र त्यांना सतत नावच ठेवले जाते. या सेवांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी टाटा ट्रस्टने मदतीचा हात दिल्याने आता महापालिकेच्या रुग्णालयांची नवी ओळख निर्माण करणार आहे. टाटा ट्रस्टने मनपा रुग्णालयांमधील सुविधांचा केलेला कायापालट हा नागरिकांचा मनपाच्या आरोग्य सेवेबाबतचा दृष्टिकोन बदलविणारा ठरणार असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रगती पाटील, आरोग्य सभापती मनोज चापले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेवक सुनील अग्रवाल, किशोर जिचकार, निशांत गांधी, शिल्पा धोटे, वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, सदर रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, दंतरोग तज्ञ डॉ. साकीब पटेल आणि डॉ. शबीना पटेल, डॉ. अंजुम बेग, डॉ. विजय जोशी, डॉ. आंबेराय, डॉ. चारू बाहेती, डॉ. सुरेश बत्रा, टाटा ट्रस्टचे सिनियर पॅथॉलॉजिस्ट डॉ. टिकेश बिसेन, डॉ. रिजेश बोस, अमर नावकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक चिव्हाणे यांनी तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
महापौरांनी केली रक्त तपासणी
केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर नंदा जिचकार यांनी प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली. त्यांनी स्वत: रक्त तपासणी करून पॅथॉलॉजीचा शुभारंभ केला. यासाठी नागरिकांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना करावयाच्या असलेल्या चाचण्यांचे शुल्क भरावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवसभरातच रिपोर्टही मिळणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीपासून ते संपूर्ण प्रक्रियेबाबतच्या भरलेल्या शुल्कासह माहिती नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.

दंत विभागाची महापौरांकडून पाहणी
सदर रुग्णालयातील अत्याधुनिक दंत विभागाचीही जिचकार यांनी पाहणी केली. दंत विभागातील सर्व सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. दंत विभागात दातांविषयीचे सर्व उपचार अत्यंत कमी दरात केले जातात. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना विभागात नि:शुल्क उपचार दिले जात असून वेळोवेळी दंत तपासणी शिबिर घेण्यात येतात, अशी माहिती यावेळी दंत विभागाचे प्रभारी डॉ. साकीब पटेल व डॉ. शबीना पटेल यांनी यावेळी महापौरांना दिली.

 

Web Title: Nagpur Municipal Hospital, at least 49 types of tests in low rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.