नागपूर मनपातील भाड्याची वाहने : निविदा उघडल्यानंतर पुन्हा दराची विचारणा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:10 AM2018-09-08T00:10:08+5:302018-09-08T00:10:54+5:30
महापालिकेत भाड्याने वाहने घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आल्या. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आलेले नाही. वास्तविक कमी दराच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निविदा सादर करणाऱ्यांना पत्र पाठवून वाहनांच्या भाड्याबाबतच विचारणा केली जात आहे. तुम्ही कमीतकमी भाड्याने वाहन देणार का, देणार असाल तर यासाठी किती भाडे द्यावे लागेल. अशा स्वरुपाची विचारणा केली जात आहे. प्रशासनाकडून प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. टॅक्सी चालकांच्या मर्जीनुसारच भाडे निश्चित करावयाचे होते तर मग निविदा कशासाठी काढण्यात आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत भाड्याने वाहने घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आल्या. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आलेले नाही. वास्तविक कमी दराच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निविदा सादर करणाऱ्यांना पत्र पाठवून वाहनांच्या भाड्याबाबतच विचारणा केली जात आहे. तुम्ही कमीतकमी भाड्याने वाहन देणार का, देणार असाल तर यासाठी किती भाडे द्यावे लागेल. अशा स्वरुपाची विचारणा केली जात आहे. प्रशासनाकडून प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. टॅक्सी चालकांच्या मर्जीनुसारच भाडे निश्चित करावयाचे होते तर मग निविदा कशासाठी काढण्यात आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेत भाड्याने असलेल्या वाहनांचा करारनामा संपला आहे. मागील सात महिन्यापासून टॅक्सी चालकांना वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्तापक्षातील एका ज्येष्ठ नगरसेवकांच्या आशीर्वादाने नवीन टॅक्सी चालकांना संधी मिळावी. यासाठी निकषात सवलत देण्यात आली होती. यासंदर्भात लोकमत ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. चौकशीनंतर पात्र निविदा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
टॅक्सी परवाना असलेल्या चारचाकी वाहने भाड्याने घेण्याबाबत मे महिन्यात निविदा काढण्यात आली होती. राज्य शासनाच्या वेबसाईटच्या माध्यमातून निविदा काढण्यात आली. परंतु यातील शर्थी व अटी वादग्रस्त होत्या. असे असूनही चौकशीनंतर निविदा उघडण्यात आल्या. यातील निकषात न बसणाºया ३४ निविदा वगळून उर्वरित निविदा उघडण्यात आल्या. यात सिडान वाहनाचे किमान भाडे २१ हजार प्रति महिना, हॅचबॅच वाहनाचे किमान भाडे २१ हजार ५०० रुपये व व्हॅन प्रकारातीलकारचे भाडे किमान २६ हजार रुपये आले. सर्वात कमी दराच्या निविदा सादर करण्याºया टॅक्सी चालकांच्या निविदा मंजूर होणे अपेक्षित होते. परंतु सामान्य प्रशासन विभागाने असे न करता त्यांना पत्र पाठवून आॅपरेटरला पुन्हा भाड्याचे दर पाठविण्यास सांगितले आहे.
...तर ५० लाख वाचले असते
जीएसटी लागू झाल्यानतंर जुन्याच दराने टॅक्सी भाड्याने ठेवण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात आली. जुन्या दराने टॅक्सी चालल्या असत्या तर वर्षाला महापालिकेच्या खर्चात ५० लाखांची बचत झाली असती. परंतु नवीन निविदा काढण्यात आल्या. त्यातही वाटाघाटी व तडजोडीचे प्रकार सुरू असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
टॅक्सी ओनर्स असोसिएशनचा आक्षेप
सामान्य प्रशासन विभागाने पत्र जारी करण्यावर आॅरेंज सिटी टॅक्सी ओनर्स असोसिएशनने आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ता पक्षनेते, विरोधी पक्षनेते व अपर आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. सर्वात कमी दराच्या निविदा मंजूर करण्यात याव्या, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुभाष घाटे यांनी केली आहे. टॅक्सीचालकांना पत्र पाठवून भाडे विचारणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.