नागपूर मनपा परिवहन : गुजरात पॅटर्न राबविल्यास निघू शकतो तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:44 PM2018-09-25T23:44:41+5:302018-09-25T23:50:12+5:30

गुजरातमधील सूरत शहरात खासगी आॅपरेटरच्या माध्यमातून शहर बस सेवा चालविली जाते. तेथे परिवहन विभागाचे ‘एस्त्रो’खाते उघडण्यात आले आहे. परिणामी बिल सादर केल्यानंतर दोन-तीन दिवसात बिलाची रक्कम आॅनलाईन आॅपरेटरच्या खात्यात जमा होते. विशेष म्हणजे परिवहन विभागाचा खर्च भागविण्यासाठी सूरत महापालिका रोड टॅक्सची वसुली करते. यातून परिवहन विभागाचा तोटा भरून काढला जातो.

Nagpur Municipal Transport: The Gujarat pattern can be implemented if implemented | नागपूर मनपा परिवहन : गुजरात पॅटर्न राबविल्यास निघू शकतो तोडगा

नागपूर मनपा परिवहन : गुजरात पॅटर्न राबविल्यास निघू शकतो तोडगा

Next
ठळक मुद्देमनपाच्या परिवहन विभागाला सक्षम करण्याची गरजसूरत महापालिका रोड टॅक्सची वसुली करते

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुजरातमधील सूरत शहरात खासगी आॅपरेटरच्या माध्यमातून शहर बस सेवा चालविली जाते. तेथे परिवहन विभागाचे ‘एस्त्रो’खाते उघडण्यात आले आहे. परिणामी बिल सादर केल्यानंतर दोन-तीन दिवसात बिलाची रक्कम आॅनलाईन आॅपरेटरच्या खात्यात जमा होते. विशेष म्हणजे परिवहन विभागाचा खर्च भागविण्यासाठी सूरत महापालिका रोड टॅक्सची वसुली करते. यातून परिवहन विभागाचा तोटा भरून काढला जातो.
परिवहन सेवा सर्वच ठिकाणी तोट्यात चालविली जाते. परंतु सुरत शहरात तोटा भरून कााढण्यासाठी विविध पर्याय शोधण्यात आलेले आहेत. नागपुरातही बसवर जाहिरात, बस स्थानकांवर जाहिरात, पे अ‍ॅन्ड पार्क च्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न परिवहन विभागाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच महापालिकेने परिवहन विभागाचे एस्त्रो खाते उघडलेले नाही. तिकिटातून मिळणारे उत्पन्न महापालिकेच्या खात्यात जमा होताच दुसरीकडे खर्च केले जाते. जेव्हा आॅपटेरला बिल देण्याची वेळ येते तेव्हा निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते.
तिकिटाच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास ५ कोटींचा महसूल जमा होतो तर खर्च ११.५० ते १२ कोटी आहे. अशा परिस्थितीत ६.५० ते ७ कोटींचा तोटा भरून काढताना अडचण येते. नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाची बिकट परिस्थिती असल्याने थकाबाकी वाढत जाऊन ४५ कोटींवर गेली आहे. परंतु दर महिन्याला तीन ते चार कोटीचे बिल दिले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीची रक्कम वाढत आहे. त्यातच १५ दिवसात रक्कम न दिल्यास थकबाकीत पुन्हा भर पडते.
आवश्यक सेवा म्हणून पाणी, वीज व कचरा संकलनाचे नियमित बिल दिले जाते. त्याच धर्तीवर परिवहन विभागाला दर महिन्याला निश्चित तारखेला बिल देण्याची व्यवस्था झाली तरच शहर बस सुरळीत सुरू राहणार आहे. अन्यथा बस सेवा सुरळीत चालणार नाही.

प्रशासनाकडून कराराचे उल्लंघन
महापालिका व तीन रेड बस आॅपरेटर यांच्यात झालेल्या कराराचे उल्लंघन होत आहे. करारानुसार परिवहन विभागाने आॅपरेटर यांचे एस्त्रो खाते उघडलेले नाही. तसेच दहा दिवसांच्या बससेवेनंतर परिवहन विभागाने करारानुसार बिल देणे अपेक्षित आहे. १५ दिवसात याची तपासणी करून एस्त्रो खात्याच्या माध्यमातून बिल आॅपरेटला मिळाले पाहिजे. परंतु गेल्या चार महिन्यात बिल मिळालेले नाही. एस्त्रो खात्यात किमान तीन महिन्याचे बिल देता येईल, इतकी रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबर २०१६ पासून आजवर महापालिकेच्या परिवहन विभागाचे एस्त्रो खाते उघडण्यात आलेले नाही.

परिवहन सेवा ही प्रशासनाची जबाबदारीच
परिवहन सेवा नफा कमावण्यासाठी नव्हे तर शहरातील सर्वसामान्य, गोरगरीब माणसांना सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने चालविली जाते. ही सरकारची व महापालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. असे असतानाही गेल्या चार दिवसापासून आपली बस बंद असूनही याबाबत प्रशासन व पदाधिकारी गंभीर नाही. शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार आहे.

खर्च कमी करण्यासाठी ६० बसेस बंद केल्या
विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांना सुविधा व्हावी यासाठी शहरातील सर्व मार्गावर बस उपलब्ध होईल. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र तीन आॅपरेटरच्या ३८० बसेस उपलब्ध असताना महापालिका प्रशासनाने परिवहन विभागाचा खर्च कमी करण्यासाठी ६० बसेस बंद केल्या.परिणामी गर्दीच्या मार्गावरील बस फेऱ्या कमी झाल्या. यामुळे काही मार्गावर प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. गर्दीमुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. नियोजनशून्यतेचाच हा प्रकार आहे.

रुग्णांची समस्या वाढली
आपली बस गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने सीए रोडच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर शासकीय मेयो रुग्णालय व डागा रुग्णालय आहे. मेयो रुग्णालयापुढे आपली बस थांबते. कामठीवरून थेट मेयो रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बसमुळे त्यांना रुग्णालयात येणे सोयीचे होत होते. परंतु बस बंद असल्याने त्यांची समस्या वाढली आहे. त्यांना आता जादा पैसे मोजून आॅटोने यावे लागत आहे. परंतु आॅटो थेट मेयो व डागा रुग्णालयाजळ येत नाही. बस सुरू असताना कमी खर्चात रुग्णालयात येणे शक्य होत होते.

गांधीबाग -इतवारीत जाणे झाले महाग
सीए मार्गावरून धावणाºया आपली बसचे दोन मार्ग आहेत. एक मेयो रुग्णालय ते टेलिफोन एक्सचेंज, वर्धमाननगर, कळमना, पारडी पर्यंत जातो. तर दुसरा मार्ग मेयो रुग्णालय ते मारवाडी चौक, शांतिनगर मार्गे कामठीपर्यंत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना गांधीबाग, इतवारी या बाजार भागात कमी खर्चात ये-जा करता येत असल्याने दिलासा मिळत होता. परंतु बस बंद असल्याने आता जादा पैसे मोजून आॅटोने जावे लागत आहे.

शाळा-महाविद्यालयात कसे जाणार ?
अंजूमन हायस्कूलची विद्यार्थिनी अफरा अंजुम दररोज फेंन्ड्स कॉलनी येथील आपल्या घरून शहर बसने ये- जा करते. बस बंद असल्याने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आॅटोचालक मनमानी भाडे घेतात. त्यातच प्रवासी मिळेपर्यंत आॅटो पुढे जात नाही. त्यामुळे शाळेत जाण्यालाही उशीर होत आहे. बसपाससाठी भरलेले पैसे वाया जात आहे. अशी अवस्था शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या इतर विद्यार्थ्यांची झाली आहे.

वेळेचे नियोजन कोलमडले
गंजीपेठ येथील रहिवासी अमोल गौर म्हणाले, हिंगणा एमआयडीसी येथील कंपनीत दररोज शहर बसने ये-जा करतो. बस बंद असल्याने समस्या निर्माण झाली आहे. आॅटोने वेळेत पोहचणे शक्य होत नाही. त्यातच बस भाड्याच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट भाडे द्यावे लागते. सिटी बसचे स्मार्ट कार्ड काढले आहे. त्यात पैसे असूनही सध्या त्याचा काही उपयोग करता येत नाही.

Web Title: Nagpur Municipal Transport: The Gujarat pattern can be implemented if implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.