नागपूर मनपा कन्हान-कोलार संगमावर बांध बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:40 PM2018-04-04T23:40:22+5:302018-04-04T23:40:34+5:30

उन्हाळ्याच्या दिवसात कन्हान नदीचे पात्र कोरडे होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. उन्हाळ्याच्या दिवसातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी कन्हान- कोलार आणि वेणा नदीच्या संगमावर महापालिका बांध बांधणार आहे.

Nagpur Municipal will construct a dam on Kanhan-Kolar union | नागपूर मनपा कन्हान-कोलार संगमावर बांध बांधणार

नागपूर मनपा कन्हान-कोलार संगमावर बांध बांधणार

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हाळ्यातील पाणीटंचाई रोखण्याचे प्रयत्न : जलप्रदाय सभापतींनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात कन्हान नदीचे पात्र कोरडे होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. उन्हाळ्याच्या दिवसातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी कन्हान- कोलार आणि वेणा नदीच्या संगमावर महापालिका बांध बांधणार आहे.
तिन्ही नद्यांच्या संगमावर बांध बांधल्यास पाण्याचा साठा होईल. उन्हाळ्याच्या दिवसात कन्हान नदीचे पात्र कोरडे पडणार नाही. यामुळे शहरातील पाणीटंचाई रोखण्याला मदत होईल. जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी बुधवारी कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. के द्र्राची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज १८५ एमएलडी पाण्याची उचल होते. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून सुमारे १३० एमएलडी पाणी शुद्ध स्वरूपात शहरात पाठवले जात असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांनी दिली. बांध बांधण्याच्या कामाला तातडीने सुरुवात व्हावी. यासाठी डीपीआर तयार करून सादर करा, पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करा, अशा सूचना झलके यांनी केल्या.
यावेळी नगरसेवक मनोज सांगोळे, एनईएसएलचे महाव्यवस्थापक दिलीप चिटणीस, ओसीडब्ल्यूचे केएमपी सिंग, प्रवीण शरण, प्रकल्प व्यवस्थापक दिनेश अटलकर, ऋचा पांडे, फरहत कुरैशी, सचिन ढोबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Nagpur Municipal will construct a dam on Kanhan-Kolar union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.