Nagpur: मायबाप म्हणते शिक, सरकार म्हणते पकोडे विक, बेरोजगार युवकांचे सरकारी धोरणाविरोधात आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Published: October 1, 2023 01:50 PM2023-10-01T13:50:53+5:302023-10-01T13:52:22+5:30
Nagpur News: सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करीत असलेल्या सरकारच्या धोरणा विरोधात नागपुरातील युवकांनी आंदोलन केले. व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्यापुढे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संविधान चौकापर्यंत रॅली काढली.
- मंगेश व्यवहारे
नागपूर - सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करीत असलेल्या सरकारच्या धोरणा विरोधात नागपुरातील युवकांनी आंदोलन केले. व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्यापुढे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संविधान चौकापर्यंत रॅली काढली. रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी हाताला काळी पट्टीबांधून आणि संविधान चौकात चहा, पकोडे विकून सरकारचा निषेध केला. पदभरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे, तत्काळ शिक्षक भरती करावी, अशी मागणी या युवकांनी केली. सरकार आता तहसिलदार कंत्राटी पद्धतीने भरीत आहे, पुढे जिल्हाधिकारीही कंत्राटीच भरतील, असा संतापही युवकांनी यावेळी व्यक्त केला. स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात युवा ग्रॅज्युएट फोरम, परिवर्तन पॅनल, ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी जनमोर्चा आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.