परशुरामसेनेच्या जयघोषाने दुमदुमली नागनगरी; वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By जितेंद्र ढवळे | Published: April 23, 2023 05:27 PM2023-04-23T17:27:52+5:302023-04-23T17:29:01+5:30

-अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उपक्रम

nagpur nagari was resounding with the shouts of parshuram sena spontaneous response to the vehicle rally | परशुरामसेनेच्या जयघोषाने दुमदुमली नागनगरी; वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

परशुरामसेनेच्या जयघोषाने दुमदुमली नागनगरी; वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

नागपूर: भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूरच्या वतीने आयोजित वाहनरॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. रॅलीच्या वेळी अचानक पावसाला प्रारंभ झाला तरी परशुराम सेनेचा उत्साह कमी न होता तो ओसंडून वाहताना दिसत होता.

रविवारी सकाळी परशुराम सेनेचे महिला, पुरुष, आणि युवक, युवती गोरक्षण येथील गोपालकृष्ण मंदिरात एकत्र झाले. सर्वाची दुचाकी वाहने, त्यावर भगवे झेंडे, भगव्या टोप्या यामुळे संपूर्ण परिसराला एक निराळीच झळाळी जाणवत होती. माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि डॉ. विलास डांगरे यांनी मंदिरातील प्रतिमेला माल्यार्पण केले. याप्रसंगी अ. भा. ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्य रथ, शंखनाद करणाऱ्या महिलांचे वाहन आणि दोन डीजे वाहन यांच्या मधोमध वाहनचालक महिला व पुरुष अतिशय शिस्तीत रॅलीत सहभागी झाले.

वाहन रॅली गोरक्षण मंदिर येथून प्रारंभ झाली, त्यानंतर  रहाटे कॉलनी चौक,  लोकमत चौक, काछीपुरा चौक, कुसुमताई वानखेडे सभागृह,  शुभमंगल हॉल भगवाघर धरमपेठ,  व्हीआयपी रोड ट्रॅफिक पार्क, धरमपेठ झेंडा चौक,  गिरीपेठ,  मामा रोड,  कॉफी हाऊस चौक, रामनगर चौक, लक्ष्मीभुवन चौक,  शंकरनगर चौक, अभ्यंकरनगर चौक,  माटे चौक,  प्रतापनगर चौक ,  सोमलवार शाळा, ऑरेंजसिटी स्ट्रीट,  मालवीयनगर,  खामला रोड, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक,  देवनगर चौक तात्या टोपे सभागृह आठ रस्ता चौक, अशोका हॉटेल, मार्गे  राणी लक्ष्मीबाई सभागृह लक्ष्मीनगर येथे वाहन रॅलीचा समारोप झाला.

मार्गात अनेक ठिकाणी पुरुष व महिलांनी औक्षण केले, पेय वाटप केले तसेच रॅलीतील रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रातील सहभाग होता . नागपुरातील सर्व ब्राह्मण संघटनांचा यात विशेष सहभाग होता. या रॅलीचे मुख्य संयोजक पराग जोशी व सर्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी यांनी केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: nagpur nagari was resounding with the shouts of parshuram sena spontaneous response to the vehicle rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर