Nagpur: गुरुवारी नागपूर-मुंबई स्पेशल धावणार
By नरेश डोंगरे | Published: November 14, 2023 11:15 PM2023-11-14T23:15:11+5:302023-11-14T23:15:23+5:30
Nagpur: प्रवाशांची वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेवून नागपूर-मुंबई ही स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही गाडी गुरुवारी १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.
- नरेश डोंगरे
नागपूर - प्रवाशांची वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेवून नागपूर-मुंबई ही स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही गाडी गुरुवारी १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.
नागपूर येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या दोन आठवड्यात लक्षणिय वाढली आहे. ते लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, गाडी क्रमांक ०११०३ नागपूर-मुंबई ही गाडी नागपूर स्थानकावरून गुरुवारी रात्री १० वाजता प्रस्थान करेल आणि दिवशी दुपारी १.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला एक द्वितीय श्रेणी, दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, १३ शयनयान आणि आठ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहणार आहेत. मार्गातील वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवर ती थांबणार आहे.