नागपुरात चेन नेटवर्किंगच्या नावाखाली डॉक्टरांसह लब्धप्रतिष्ठितांचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:43 PM2018-01-30T22:43:00+5:302018-01-30T22:51:34+5:30

चेन मार्केटिंगच्या नावाखाली विविध प्रकारचे लाभ आणि घरबसल्या लाखोंचा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या क्यू नेट कंपनीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड केला आहे. या कंपनीतील दोन डॉक्टरांसह १० आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

In Nagpur the name of Chain Networking doctors with richest person cheated | नागपुरात चेन नेटवर्किंगच्या नावाखाली डॉक्टरांसह लब्धप्रतिष्ठितांचा गोरखधंदा

नागपुरात चेन नेटवर्किंगच्या नावाखाली डॉक्टरांसह लब्धप्रतिष्ठितांचा गोरखधंदा

googlenewsNext
ठळक मुद्देसोयीसुविधा अन् लाखोंचे आमिषशेकडो जणांना गंडाआर्थिक गुन्हे शाखेने केला भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चेन मार्केटिंगच्या नावाखाली विविध प्रकारचे लाभ आणि घरबसल्या लाखोंचा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या क्यू नेट कंपनीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड केला आहे. या कंपनीतील दोन डॉक्टरांसह १० आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे चेन नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्या   कंपन्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
आरोपी डॉ. कविता खोंड, मृणाल धार्मिक, प्रशांत धार्मिक, आशिष लुणावत, किशोर भंडारकर, मंगेश चिकारे, रुतुजा चिकारे, प्रशांत डाखोळे (डाखोडे), प्रज्ञा डाखोळे आणि श्रीकांत रामटेके यांनी काही वर्षांपूर्वी क्यू नेट नामक कंपनी सुरू केली. या कंपनीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी अभिकर्तेही नेमले. या कंपनीचे सभासद बनलेल्यांना देश-विदेशात पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, शॉपिंग, कॉर्पोरेट फायनान्स, टेलिकम्युनिकेशन, ई-कॉमर्स, लाईफ स्टाईलसोबतच विविध कंपन्यांच्या उत्पादनाची माहिती दिली जात होती. कंपनीची क्यू व्हीआयपी क्लब मेंबरशिप घेतल्यास मिळणाऱ्या   सुविधांमध्ये मोठी सूट तसेच मोफत भेटवस्तू देण्याचेही प्रलोभन दाखविले जात होते. एक सभासद बनल्यास त्याला आणखी सभासद आणि त्या सभासदाला पुन्हा तसेच आमिष दाखवून दुसरे सभासद बनवून (ग्राहकांची साखळी) वेगवेगळ्या आर्थिक फायद्याचीही माहिती दिली जात होती. एका सभासदाच्या उलाढालीवर थेट १० टक्के कमिशन देण्याचे आमिष मिळाल्यामुळे ते मिळविण्यासाठी सभासद झालेली मंडळी आणखी ग्राहकांना या कंपनीशी संलग्न करायची. अशाप्रकारे ग्राहकांची संख्या वाढवून उपरोक्त आरोपी बक्कळ पैसा जमवत होते. उपरोक्त आरोपींनी नागपूरसह ठिकठिकाणांहून अशाप्रकारे शेकडो ग्राहकांना कंपनीशी जोडले.
बनवाबनवीचा कळस
वेगवेगळे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना क्यू नेट कंपनीशी जोडणाºया आरोपींनी कंपनीच नव्हे तर सभासदांच्या नावे याहू संकेतस्थळावर बनावट मेल आयडी तयार केले. आम्ही तुमची रक्कम वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतविली असून, त्याचा लाभांश विशिष्ट प्रकारे मिळतो, असे ते सांगायचे. गुंतवणूकदारांना त्याच्या खात्यात पॉर्इंटच्या रूपाने रक्कम जमा होत असल्याचेही बनावट मेल ते पाठवीत होते. प्रत्यक्षात ते क्यू नेटमध्ये त्यांची रक्कम जमाच करीत नव्हते. स्वत:च ती रक्कम वापरत असल्याने आपली रक्कम परत घ्यायला गेलेल्यांना ते वेगवेगळे कारण सांगून टाळत होते. आंचल एस. लाल (वय ४९, रा. स्वावलंबीनगर) यांनी अशाच प्रकारे आपली ९ ते १३ लाख रुपयांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना टाळले.
पाच वर्षांत पाच कोटी
पाच वर्षे वाट बघा, नऊ ते दहा लाखांचे पाच कोटी रुपये मिळतील, असे ते सांगत होते, असे समजते. त्यामुळे लाल यांनी २०१५ मध्ये गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली. अलीकडे अन्य ११ जणांनी अशाच प्रकारची तक्रार उपरोक्त आरोपींविरुद्ध नोंदविली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. डी. शेख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. उपरोक्त आरोपींनी एकूण १२ जणांची ९३ लाख २१ हजार २५६ रुपयांनी फसवणूक केल्याचे पुरावे हाती लागल्यानंतर, सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉक्टर, प्रोफेसर गजाआड
आरोपी डॉ. कविता खोंड, डॉ. मृणाल धार्मिक, प्रशांत धार्मिक, आशिष लुणावत, किशोर भंडारकर, मंगेश चिकारे, रुतुजा चिकारे, प्रशांत डाखोळे (डाखोडे), प्रज्ञा डाखोळे आणि श्रीकांत रामटेके यांच्यापैकी डॉ. कविता खोंड आणि मृणाल धार्मिक या आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. प्रशांत आणि प्रज्ञा डाखोळे हे दाम्पत्य डॉक्टर असून, त्यांचे क्लिनिक असल्याचेही समजते. पोलिसांनी आज सायंकाळी डॉ. कविता खोंड, डॉ. मृणाल धार्मिक आणि डॉ. प्रशांत तसेच डॉ. प्रज्ञा डाखोळे या पाच जणांना अटक केली. त्यांची उद्या पोलीस कोठडी मिळविली जाणार आहे.

Web Title: In Nagpur the name of Chain Networking doctors with richest person cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.