नागपुरात  कथित कोळसा व्यापाऱ्याने १७ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:12 AM2018-05-08T01:12:36+5:302018-05-08T01:12:54+5:30

कोळसा व्यापारात भागीदारी आणि बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चंदन वीरेंद्रकुमार जैन (वय ३३) नामक आरोपीने एका किराणा व्यावसायिकाला १७ लाख ५० हजारांचा गंडा घातला.

In Nagpur, in the name of a coal trader grabbed17 lakhs |  नागपुरात  कथित कोळसा व्यापाऱ्याने १७ लाख हडपले

 नागपुरात  कथित कोळसा व्यापाऱ्याने १७ लाख हडपले

Next
ठळक मुद्देभागीदारीच्या नावाखाली विश्वासघात : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा व्यापारात भागीदारी आणि बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चंदन वीरेंद्रकुमार जैन (वय ३३) नामक आरोपीने एका किराणा व्यावसायिकाला १७ लाख ५० हजारांचा गंडा घातला.
सुधीर केशवराव जांभूळकर (वय ४८) हे बेझनबागमध्ये राहतात. ते किराणा व्यावसायिक असल्याचे पोलीस सांगतात. परवारपुरा इतवारीतील जैन मंदिरजवळ राहणारा आरोपी चंदन जैन याची जांभूळकरसोबत जुनी ओळख आहे. कोळसा व्यवसायात जेवढे जास्त रक्कम गुंतवली तेवढा जास्त नफा मिळतो, असे जैन जांभूळकरांना सांगत होता. तुम्ही माझ्या व्यवसायात भागीदार म्हणून रक्कम गुंतवा, तुम्हाला लाखोंचा लाभ मिळेल, असेही तो सांगायचा. त्याच्यावर विश्वास ठेवून जांभूळकर यांनी जैनसोबत भागीदारी सुरू केली. १६ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत त्याला १७ लाख ५० हजार रुपये दिले. जैन याने जांभूळकरांना भागीदारी करारपत्र तयार करून दिले. आपला व्यवसाय चांगला सुरू आहे, हे दाखवण्यासाठी बनावट वाहतूक पावत्या (ट्रान्सपोर्ट स्लीप) आणि कोळसा खरेदी आणि विक्रीच्या बनावट नोंदीही दाखवल्या. प्रत्यक्षात जेव्हा जांभूळकरांनी व्यवसायातील लाभाची रक्कम मागितली तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. त्याची संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली असता तो फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जांभूळकरांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अनेकांची फसवणूक
आरोपी चंदन जैन बड्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे सांगून अनेकांवर प्रभाव टाकतो. त्याने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. अनेकांनी फसवणूक होऊनही तक्रार नोंदवली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
 

Web Title: In Nagpur, in the name of a coal trader grabbed17 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.