Nagpur: पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ अन् इतर प्राणी पाहून निसर्गप्रेमी सुखावले, मचाण गणनेला उत्स्फूर्ते प्रतिसाद, २२४ प्राण्यांचे घडले दर्शन

By दयानंद पाईकराव | Published: May 7, 2023 02:39 PM2023-05-07T14:39:29+5:302023-05-07T14:40:36+5:30

Pench Tiger Reserve: निसर्ग अनुभव कार्यक्रमांतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मधील पाणस्थळावरील मचाण गणनेदरम्यान वाघ आणि २२४ इतर प्राण्यांना पाहून निसर्गप्रेमी सुखावले. मचान गणनेला निसर्गप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला.

Nagpur: Nature lovers happy to see tigers and other animals in Pench Tiger Reserve, spontaneous response to scaffold count: 224 animal sightings | Nagpur: पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ अन् इतर प्राणी पाहून निसर्गप्रेमी सुखावले, मचाण गणनेला उत्स्फूर्ते प्रतिसाद, २२४ प्राण्यांचे घडले दर्शन

Nagpur: पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ अन् इतर प्राणी पाहून निसर्गप्रेमी सुखावले, मचाण गणनेला उत्स्फूर्ते प्रतिसाद, २२४ प्राण्यांचे घडले दर्शन

googlenewsNext

- दयानंद पाईकराव

नागपूर -  निसर्ग अनुभव कार्यक्रमांतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मधील पाणस्थळावरील मचाण गणनेदरम्यान वाघ आणि २२४ इतर प्राण्यांना पाहून निसर्गप्रेमी सुखावले. मचान गणनेला निसर्गप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला.

पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणस्थळावरील निसर्ग अनुभव कार्यक्रमांतर्गत मचान गणनेचे आयोजन करण्यात आले होते. या मचान गणनेला निसर्गप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला. पवनी आणि नागलवाडी बफर वनपरिक्षेत्रात एकुण ३४ मचान निसर्गप्रेमींना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी २५ एप्रिल ही अर्ज करण्याची अखेरची तारीख होती. मचाण गणनेसाठी १५० हून अधिक अर्ज मिळाले होते. काही अर्ज इतर राज्यांमधूनही आल्याची नोंद वन विभागाने केली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या आधारावर सहभागींची निवड करण्यात आली. ३४ पैकी सात मचान महिलांना देण्यात आल्या.

दोन्ही वनपरिक्षेत्रात सहभागी निसर्गप्रेमींनी वाघ पाहिले. गौर, जंगली कुत्रा, ठिपकेदार हरीण, सांभर, नीलगाय, मुंगुस, जंगली मांजर आदी २२४ प्राणी बफर झोनमधील मचाणमधून पाहण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागात क्षेत्रीय कर्मचाºयांकडून मचाण गणना करण्यात आली. एकुण ७० मचाणचा वापर कोअर परिसरात जनगणनेसाठी करण्यात आला. चोरबाहुल रेंजमध्ये १५ मचानमध्ये एकुण ४७५ सर्वाधिक प्राण्यांची नोंद करण्यात आली. एकुणच निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होऊन निसर्गप्रेमी सुखावले.

Web Title: Nagpur: Nature lovers happy to see tigers and other animals in Pench Tiger Reserve, spontaneous response to scaffold count: 224 animal sightings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.