वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा नागपूर मनपात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 08:07 PM2019-02-26T20:07:35+5:302019-02-26T20:08:10+5:30
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर महाल येथील महापालिकेच्या टाऊ न हॉलसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी बॅन्ड पार्टीच्या गाण्यावर नाचून एकच जल्लोष केला. सैराट चित्रपटाच्या गाण्यावर नगरसेवकांनी ताल धरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर महाल येथील महापालिकेच्या टाऊ न हॉलसमोर सर्वपक्षीय नगरसेवकांनी बॅन्ड पार्टीच्या गाण्यावर नाचून एकच जल्लोष केला. सैराट चित्रपटाच्या गाण्यावर नगरसेवकांनी ताल धरला.
महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे भावी अध्यक्ष प्रदीप पोहाणे, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल, बाल्या बोरकर, महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, क्रीडा सभापती नागेश सहारे, विधी सभापती धर्मपाल मेश्राम, झोन सभापती प्रकाश भोयर, रिता मुळे, पिंटू झलके, दीपक चौधरी यांच्यासह पदाधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवक यात सहभागी झाले होते.
मदतनिधीसाठी नगरसेवक देणार २-२ हजार
महापौरांनी सभागृहात जल्लोषाची घोषणा करताच काँग्रेसचे नगरसेव हरीश ग्वालबंशी यांनी पुलवामा येथील घटनेतील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून नगरसेवकांनी प्रत्येकी एक हजार देण्याचा प्रस्ताव मांडला. याचे सर्व नगरसेवकांनी समर्थन केले. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनीही या प्रस्तावाचे समर्थन करीत एक हजाराऐवजी प्रत्येकी दोन हजार देण्याची सूचना केली. याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.