नागपूर मनपात पेन्शनच्या १९.३९ कोटींचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:23 AM2018-04-19T00:23:54+5:302018-04-19T00:24:09+5:30

महापालिकेने पेन्शनसाठी पात्र असलेल्या २,३२४ स्थायी कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोट्यवधीची रक्कम कपात करण्यात आली. परंतु महापालिकेने आपल्या वाट्याची १९.३९ कोटींची रक्कम या योजनेत अद्याप जमा केलेली नाही. हा घोळ उघडकीस आल्याने कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

Nagpur NMC pension of 19.39 crore scam | नागपूर मनपात पेन्शनच्या १९.३९ कोटींचा घोळ

नागपूर मनपात पेन्शनच्या १९.३९ कोटींचा घोळ

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांत खळबळ : अंशदान सेवानिवृत्त योजनेची रक्कम जमा केली नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने पेन्शनसाठी पात्र असलेल्या २,३२४ स्थायी कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोट्यवधीची रक्कम कपात करण्यात आली. परंतु महापालिकेने आपल्या वाट्याची १९.३९ कोटींची रक्कम या योजनेत अद्याप जमा केलेली नाही. हा घोळ उघडकीस आल्याने कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
महापालिका सेवेत २००५ सालानंतर नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही. याचा विचार करता महापालिकेने ३ फेब्रुवारी २०१० पासून कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू केली. परंतु योजनेचे निकष व नियम बनविण्यात आलेले नाही. यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. योजनेचा घोळ सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या रकमेचा डाटा उपलब्ध नाही.
डीसीपीएस योजना २००५ सालापासून लागू करण्यात आली. परंतु नोव्हेंबर २००५ ते ३१ आॅक्टोबर २०१० या कालावधीत नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची अंशदान रक्कम वसूल करण्यात आलेली नाही. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१० ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के अंशदान रक्कम म्हणजेच एकूण १३ कोटी ९१ लाग ३ हजार जमा करण्यात आले. ही रक्कम करताना घोळ करण्यात आला. असे असतानाही सेवानिवृत्तांना वा मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावा वित्त विभागाने केला आहे.

Web Title: Nagpur NMC pension of 19.39 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.