नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या पोहचली १०४ वर; विदर्भात १७७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:59 PM2020-04-24T18:59:14+5:302020-04-24T18:59:49+5:30
विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात ५२ वर्षीय पुरुष तर पहिल्यांदाच नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात ५० वर्षीय महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात ५२ वर्षीय पुरुष तर पहिल्यांदाच नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात ५० वर्षीय महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना रुग्णांनी शंभरी ओलांडली आहे. नागपुरात १०४ कोरोनाबाधित आहेत. विदर्भात एकूण रुग्णांची संख्या १७७ वर पोहचली आहे.
विदर्भात रुग्ण वाढत असले तरी नागपुरात आज दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यात नागपूरसह, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, गोंदिया व वाशिम या जिल्ह्यातच कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाला व आरोग्य नियंत्रणाला इतर जिल्हे कोरोनामुक्त ठेवण्यास तूर्तास तरी यश आले आहे.